मंगलवार, 4 दिसंबर 2018

शेवटची लोकल ( Marathi Stories)

शेवटची लोकल 

-कौशिक साऊळ
रात्री 12-30 ची शेवटची ठाणे लोकल पकडण्यासाठी मुसळधार पावसातून भिजत भिजत कसाबसा खोपोली स्टेशन पोचलो .गाडी निघाली होतीच पण सवयीनं धावत जावुन लोकल पकडली .आत पाच सहा प्रवासी होते .नाही पाचच होते.मी सहावा होतो .तर मी मस्त विंडो सीटवर बसलो .त्याच काय आहे दिवस असो वा रात्र हिवाळा असो नाहीतर पावसाळा आपल्याला विंडो सीटच लागते .पावसाचा जोर ही कमी झाला होता खोपोलीचा थंडगार वारा झोंबत होता.साला अश्या वेळी उबेसाठि जवळ कुणीतरी लागत .ए , कुणी म्हणजे कुणीही नाही हा .आपण त्यातले नाही .आपण अनैसर्गिक असं काहीच करत नाही .कुणीतरी म्हणजे गोरी गोरी , सडपातळ , लांब काळ्याभोर केसांची जिच्या लांबसडक केसांत स्वतःचं आयुष्य गुंतवून टाकावं .जिच्या नाजूक देहात स्वतःला ओवाळून टाकावं.पण साल ह्या बाबतीत आपलं नशीबच फुटकं .तश्या आयुष्यात तीनजणी येऊन गेल्या पण त्यांच्यात "ती बात "नव्हती .त्याचं काय आहे आपल्या चॉईसच्या ज्या हिरकणी आल्या त्यांनी आपल्याला पहिल्या भेटीतच भाऊ मानला ना .म्हणूनच तर म्हणालो "साल ह्या बाबतीत आपलं नशीबच फुटकं ". मी डब्यात आजुबाजुला नजर टाकली तर माझ्या समोरच्या सीटवर एक माणूस बसला होता बसल्या बसल्याच तो झोपला होता .बाजूच्या सीटवर समोरासमोर दोघं बसले होते .त्यातला एक मोबाईल चाळत होता तर दुसरा टेन्शन मधे विचार करत होता .मला त्याला पाहून हसूच आलं. साला आधीच ओवर टाइम करून थकलोय त्यांत घरी जावून सुंदर बायकोच्या अतृप्त भुकेल्या शारीरिक गरजा भागवा.नक्कीच तो हाच विचार करत होता त्याचं काय आहे आपल्याला चेहरा चांगला वाचता येतो .पावसाचा जोर वाढला तसं सगळे खिडकी बंद करू लागले .मगापासून पुढच्या सीटवर पाठमोरी बसलेले "ती "होती .गोरी गोरी , सडपातळ , लांब केसांची नाजूक हिरकणी .खिडकी बंद करायला उठली तेव्हा ती दिसली .तिने माझ्याकडे पाहुन स्माईल केलं .ते का केलं ?हे तिलाही कळलं नाही म्हणून ती गोंधळून पटकन खाली बसली ...... दरवाज्यात उभं राहून " तो " सिगारेट ओढत होता.त्याच्या बाजूला एक गोनी होती ती त्याचीच होती त्याच्या एकूण अवतारावरण ती त्यालाच जास्त शोभत होती .तो बाहेरच पाहत होता आणि अचानक त्याने माझ्यावर नजर टाकली का कुणास ठाऊक पण मी त्याच्या अश्या अचानक पाहण्याने घाबरलोच .कारण त्याच्या डोळ्यात मला एक क्रूर विक्षिप्तपणा जाणवला होता .मी आपण त्यातले नाहीच ह्या आविर्भावात स्वतःला सावरत उगाचच मान खाली टाकून पिशवी चाचपू लागलो .तेवढ्यात मोबाईल वर एक msg आला .तो msg वाचून भीतीने माझी गाळणच उडाली.तो महाराष्ट्र पोलिसांचा अलर्ट msg होता .ती बातमी आठवड्यापूर्वी तशी मी वाचली होती.पण कामाच्या व्यापात ती सिरियल killer ची बातमी विसरलो होतो .आतापर्यंत पाच खून झाले होते ...ते ही शेवटच्या लोकलमधे .....msg होता शेवटच्या लोकलने प्रवास करताना खबरदारी बाळगा.सावध रहा .जर कुणी संशयित दिसल्यास पोलिसांना कळवा .
डब्यातले सगळे एकमेकांकडे पाहु लागले .कारण तो msg सगळ्यांना आला होता .माझ्या समोरचा तर लक्ख जागा झाला होता .डोळे विस्फारून माझ्याकडे पाहत होता जणू काही मी .....सगळ्यांच्या मनांत गोंधळ सुरू होता .सगळे एकमेकांकडे संशयित नजरेने पाहत होते .पण " तो " मात्र दरवाज्यात खाली भिजत बसला होता .त्याने पुन्हा माझ्याकडे एक नजर टाकली आणि विक्रूत स्मित हसला आणि बाहेर पाहू लागला .डोलवली स्टेशन आल माझ्या बाजूच्या सीटवरचा एक घाईघाईत उतरला .माझ्या ही मनांत आलं होत की ह्या स्टेशनवर उतरू का ?पण नको जर जो उतरलाय तोच सिरियल किलर असेल तर ?.....गाडी सुरू झाली आता आम्ही पाचजण होतो.तो दरवाज्यात तंबाखू मळत बसला होता .मधे मधे माझ्याकडे पाहत होता .बाजूच्या सीटवरचा मोबाईलवर call करत होता पण call कसा लागणार ?नेटवर्कच नव्हतं .तेवढ्यात एक स्टेशन आलं आणि तो पटकन उतरला .गाडी सुरू झाली आणि आम्ही त्या डब्यात चौघं .माझ्यासमोरचा डोळे सताड उगडे ठेवून एकदम ताठ बसला होता .खरं तर आता मला त्याचीही भीती वाटत होती .कर्जत स्टेशन आलं तसं तो ताडकन उठून पळत सुटला .मला ही वाटलं उतरू इथे ?नको जर " तो" पण उतरला आणि माझा पाठलाग करून मला .........आणि तो उतरलाच नाही तर "ती "एकटीच होती ...
आता आम्ही तिघेच होतो "तो ",ती "आणि मी 
तो तिथेच बसला होता तो आता आम्हा दोघांकडे मधेमधे पाहत होता .मी खूप घाबरलो होतो आणि ती ही आणि तो तसाच भिजत तिथे बसला होता .
तिने माझ्याकडे वळून पाहिले तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती .कदाचित तिला माझा आधार हवा होता.मला ही वाटलं तिच्या बाजूला जावून बसावं तिला धीर द्यावा .पण त्याचं काय आहे हिरकणी बघितली की आपली बोलतीच बंद होते .साला मेंदूच चालत नाही .तो गोनी चाळत होता आणि अचानक आमच्या कटाक्ष टाकून उठून उभा राहिला तशी ती पटकन माझ्या समोरच्या सीटवर येऊन बसली.कदाचित मी तिला सभ्य वाटलो असेन .वाटलो असेन काय ?अहो मी सभ्यच आहे . माझ नावही सभ्यपणाला शोभत .कौशिक ह्या नावातच सभ्य आणि सुसंकृतपणा ठासून भरलाय .तर मी किती सभ्य आणि सुसंकृत आहे आहे हे तिला सांगायची वेळ नव्हतीच .
तो गोनी घासत आमच्या जवळ येऊ लागला .त्याच्या गोनीतला लोखंडी रॉडचा कानठळ्या करणारा आवाज डब्यातली शांतता चिरत होता .ती घामाने पूर्ण भिजली होती तिचा श्वास जोरजोरात चालू होता .तिच्या छातीतली धडधड जाणवत आणि स्पष्ट दिसतही होती .आह काय विहंगम दृश्य होत ते .
तो माझ्यासमोरच बसला होता त्याचा एक हाथ गोनीत होता .ती माझ्या बाजूला घाबरून बसली होती .खरंच ती सुसंस्कृत आणि सभ्य होती .थर्ड क्लास असती तर मला बिलगली असती .माझे पाय जागच्या जागी तिझले होते .कुणीच काही बोलत नव्हतं आणि तो बोलला......... एकूणच त्याच्या विकृत व्यकीमत्वाला न शोभणार्याभेदरट बालिश आवाजात ....भाईसाब माचिस है क्या ?मी काहीच बोललो नाही
बदलापूर स्टेशन आलं नि तो गाण गुणगुणत उतरला .आयला खरंच कधी कधी दिसत तसं नसतं . गाडी सुरू झाली . आता आम्ही दोघंच होतो ती , मी आणि शांतता ......
होय प्रचंड शांतता पसरली होती .आणि आम्ही दोघं आता घडलेल्या प्रसंगामुळे मोठमोठ्याने हसू लागलो .वाटलं आता हिच्याशी बोलावं hi मी कौशिक .सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि डोंबिवलीसारख्या सुसंकृत शहरात माझा 2 bhk flat आहे .पण नको कारण आत्तापर्यंत जेवढे खून झाले होते ते फर्स्ट क्लास मधेच ....आणि सिरियल किलर स्त्री की पुरुष हे ही कुणाला माहीत नव्हतं
मुली सिरियल किलर नसू शकतात ?कारण धोका हा नेहमीच सभ्य आणि सुंदर असतो. आणि कधी कधी दिसतं तसं नसतं .कदाचित ती ही हाच विचार ......नाही मी तसा नाही अहो मी तर खुप सभ्य आहे .
मी माझ्या पिशवीत हात टाकला आणि माझ्या हाताला सुरा लागला तसा मी तो अलगद बाहेर काढून तिच्या मानेवरन सर्रकन फिरवला .......

सोमवार, 3 दिसंबर 2018

प्रवास... (काल्पनिक कथा) (Marathi Stories )

प्रवास... (काल्पनिक कथा)

दिपिका आस्वार
भाग १ व २.

उन्हाळ्याचे दिवस होते.... परिक्षा संपली असल्या कारणाने हॉस्टेलला सुट्टी लागली होती... सर्व जण आपापल्या घरी गेले होते... पण काही मुलं कुठेही न जाता रुम मध्येच होती... कदाचित त्यांना आपलं असं कोणी नसावं... रोहन आणि प्रवीण पण गावी जायच्याच तयारीत होते,,, पंधरा दिवसांनी रोहनच्या बहिणीच लग्न होतं... त्याला मदत म्हणून प्रवीण त्याच्या सोबत चालला होता,, प्रवीण हा त्याचा जिवलग मित्र... त्यांनी भराभर सगळी आवरा आवर केली... सकाळीच रोहनच्या आईने त्याला फोन करून सांगितले होती की,,, तुझ्या ताईच लग्न ठरलंय... लवकर ये इकडे.... सुट्टीमध्ये कुठेही जायचं नाही असं त्यांनी ठरवलं होतं.... पण आता तर त्यांना जावंच लागणार होतं... गावी जाण्यासाठी सहा ते सात तास लागत असे.. त्यातही बस वेळेवर आली तर ठीक,,, नाही तर अर्धा ते पाऊण तास बस स्टॉप वरच बसावं लागायचं... ती बस ठरावीक ठिकाणीच थांबायची... ते दोघं दुपारी दोन वाजता निघणार होते... अजूनही त्यांच्याकडे एक ते दीड तास होता... सगळं घेतलंय ना.. ते बघण्यासाठी ते पुन्हा बॅग पाहू लागले... त्याच गडबडीत असताना त्यांना कोणीतरी हाक मारली.... रोहन...... प्रवीण...... तसं त्यांनी मागे पाहिले... तर मागे जीन्स-टॉप घातलेली एक काळी सावळी मुलगी त्यांच्याकडे बघून स्माईल देत उभी होती.... त्यांनीही तिला किंचित स्माईल दिली आणि "आत ये" अस बोलून पुन्हा आपलं काम करत बसले... कुठे चाललाय का तुम्ही... बॅग का भरून ठेवल्या आहेत??? एका मागून एक असे प्रश्न ती त्यांना विचारत होती.... पण ते शांतपणे रूम आवरत होते... अरे सांगा ना,,,, पळून तर नाही ना चालले तुम्ही.... असे असेल तर मी पण येऊ का तुमच्या सोबत...?? तिने एक भुवयी उडवत त्यांना विचारले.... तसे ते दोघ तिला बघून मोठ्याने हसू लागले.... त्यांचं ते हसणं बघून ती खूप चिडली.... त्यांना बडबडतच ती रूम बाहेर जाणार तितक्यात प्रवीण म्हणाला,,,, अगं थांब नकटे.... किती राग ग तुझ्या ह्या नकट्या नाकावर.... असं म्हणत त्याने तिचे नाक जोरात ओढले.... आ,,,, ओरडत तिने त्याला एक फटका लावून दिला.... सांग ना कुठे जाताय तुम्ही??? अगं पंधरा दिवसांनी रोहनच्या ताईच लग्न आहे म्हणून गावी चाललोय..... वेडाबाई,,,, अस म्हणत तो गादीवर बसला... मी पण येऊ का??? ती रोहनकडे बघत म्हणाली....तो काही बोलणार तेवढ्यात प्रवीण म्हणाला,,, नको... नको.... तुझ्या सारख्या नकटीला कोण सोबत घेऊन जाईन... आणि एकटाच हसू लागला... हो-हो... आणि तू नेपाळी... हिहीही... दात दाखवत ती हसली...तुझे आई-बाबा तुला आमच्या सोबत इतक्या लांब पाठवतील का?? रोहनने प्रश्नार्थक नजरेने विचारले... तशी ती लगेच हो म्हणाली... ह्या आधी ही आई बाबांनी मला तुमच्या सोबत पाठवलं आहे... आताही पाठवतील... तसंही त्यांना तुम्ही आणि तुमचा स्वभाव खूप आवडतो.... तर मग,, ठीक आहे.. त्यांना विचार आणि सगळं आवरून इकडेच ये.... ते ही लवकर... तशी ती पटकन निघून गेली...

ह्यांच सगळं आवरून झालं होतं,,, ते तिची वाट बघत होते... फक्त पाऊण तास उरला होता.... दहा मिनिटं झाली तरी ती आली नाही... प्रवीणने तिला कॉल केला.... कॉल रिसीव करत ती म्हणाली हॅलो,,, बोल प्रवीण... अगं आहेस कुठे??? बस भेटली पाहिजे आपल्याला.... लवकर ये.... त्याच बोलणं पूर्ण होताच ती म्हणाली... तुम्ही बस स्टॉप जवळ थांबा... मी बाबांना घेऊन येते आणि कॉल कट केला... काय म्हणाली ती,, निघाली का?? रोहनने विचारले... हो... तिने आपल्याला बस स्टॉप जवळ थांबायला सांगितलं आहे.. ती आपल्याला तिथेच भेटेल म्हणाली... तसे दोघांनीही आपापल्या बॅग खांद्यावर लटकवल्या आणि रूम बाहेर आले... रोहनने रूमला कुलूप लावले... आणि ते रिक्षानेच बस स्टँड जवळ आले... १५ मिनिटाने बस येणारच होती पण त्रिवेणी अजून आली नव्हती.. दोघांचंही लक्ष तिच्या येण्याकडे होतं.. बघता बघताच ५ मिनिट निघून गेले.. प्रवीण म्हणाला.. तुला वाटतं का,,,ती येईल.?? वाटतं का काय,,, ती आली बघ... अस म्हणत रोहन समोरच बघत होता.. प्रवीणने ही त्यांना पाहिलं...ती आणि तिचे बाबा कार मधून खाली उतरले... त्या दोघांकडे बघत तिचे बाबा म्हणाले.... कशी गेली परीक्षा?? चांगली गेली,,, अस म्हणत त्यांनी एकमेकांकडे पाहिले... म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएट होणार तर... असं म्हणत त्यांनी रोहनच्या पाठीवर जोरात थाप मारली... तेवढ्यात बस आली... तसे सगळेच जमा झाले... नीट जा पोरांनो... कुठे पण थांबू नका,,, काही झालं तर लगेच मला फोन करा.... असे ते ओरडून त्यांना सांगत होते... तसे तिघंही मान हलवत हो हो म्हणत बसमध्ये गेले.... खूप गर्दी होती... नशिबाने त्यांना बसच्या मागच्या सीटवर बसायला भेटले....बरं झालं ना,,, आपल्याला बसायला जागा भेटली.... गर्दीला बघतच त्रिवेणी म्हणाली.... हो ना... बरं झालं तू अजून लवकर आली नाहीस... नाही तर आपल्याला बाहेरच उभं राहावं लागलं असतं... नाही का??? तशी ती रागवत तिरक्या नजरेने त्याला बघू लागली... तो हसतच होता... तू गप रे माकडा...... जेव्हा बघावं तेव्हा तुझी टीवटीव चालू असते... तिच्या ह्या बोलण्यावर त्याने तिला एक टपली मारली.... पण रोहन मात्र शांतच बसून सगळीकडे नजर फिरवत होता..... प्रवासाला सुरुवात झाली तसा बसमधला गोंगाट ही काहीसा कमी झाला... खिडकीतून बाहेर पाहिलं तर झाडे मागे मागे पळताना दिसत होती... ऊन कमी झाले होते.... तरीही थोडं फार गरम होतंच होतं.... पण खिडकीतून अधून मधून येणारी वाऱ्याची झुळूक अंगाला गारवा देत होती... प्रवास तर चांगला सुरू होता पण पुढे काय घडणार?? ह्याची साधी कल्पनाही नव्हती कोणाला......
*क्रमशः...*
---------------------------------------------------

भाग २


अजूनही बसमध्ये कुजबूज चालूच होती.... मधेच कोणाचा तरी हसण्याचा आवाज येत होता... तर कधी लहान मूल रडण्याचा..... प्रवीण आणि त्रिवेणी भांडण्याच्या मूड मध्ये होते.... पण रोहनची नजर समोर बसलेल्या त्या मुलीकडे होती.... कोणी ना कोणी मध्ये यायचं तरीही तो नजर इकडे तिकडे करून तिलाच बघायचा प्रयत्न करत होता.... काय रे रोहन,,, लक्ष कुठे आहे तुझं....??? अस म्हणत प्रवीणने त्याच्या खांद्यावर हात ठेवला.... कुठे काय,,, काहीच नाही असं म्हणून तो मोबाईल मध्ये बघू लागला.... ये काय चाललंय तुमचं??? त्रिवेणीने विचारलं.... तुला इथेच सोडून जायचा विचार चाललाय आमचा... त्याच्या ह्या बोलण्याने रोहनही हसू लागला... जोक होता हा?? अस म्हणत ती पुन्हा खिडकीकडे पाहू लागली.... आणि रोहन त्या मुलीकडे... तितक्यात प्रवीनच लक्ष त्या मुलीकडे गेले... ओह्ह,,, म्हणजे साहेबांचं लक्ष इकडे आहे तर..... रोहनकडे नजर टाकत तो म्हणाला... ए मंद,,, तुला एक गोष्ट सांगू का?? नको सांगू.. मला नाही ऐकायचं काही.... ती नाक मुरडतच म्हणाली.... अगं ऐक तर... समोर त्या मुलीला बघ ना... काय करू तिला बघून?? ठीक आहे नको बघू.... मी आणी रोहन बघतो.... लगेच ती त्यांना मागे सारून त्या मुलीला बघू लागली.... आई ग,,, अगं म्हशे,,, बाजूला हो...... नाही तर आमचा पापड होईल... त्याच्याकडे बघत ती मागे सरकली... भारी दिसते ना ती,, प्रवीण म्हणाला... इतकी पण खास नाही.... तू तर अप्सराच ना... अय्या खरंच.... हाट,,,, काळे.... बाजूला हो नाही तर मला तुझा रंग लागेल... आणि हसला... ती चिडून काही न बोलता शांत बसली.... तेवढ्यात कंडक्टर तिकीट,,, तिकीट... बोलत समोर येऊन उभा राहिला... कुठे जायचंय तुम्हांला??? त्याने रोहनला विचारले" येनव्याल्या." किती पाहिजे... तीन द्या... तीन तिकीट देऊन,, पैसे घेऊन तो पुढे गेला... बसमध्ये बसून दीड तास होऊन गेला होता... मला खूप भूक लागली आहे,, त्रिवेणी म्हणाली.... मला ही.... नाही तरी तू बकासूरच आहेस आणि तू भुक्कड... हे.. हे..हे करत दोघ हसले... अर्ध्या तासाने पुढच्या स्टॉपला बस थांबेल तेव्हा खा पाहिजे तेवढं... रोहन म्हणाला तसे दोघही शांत बसले... हॅलो... भाऊ.. तू मला घ्यायला येतोय ना... पोहचले की सांगेल तुला... दोन तास तरी लागतील... असं म्हणत तिने कॉल ठेवला.. ती एकटीच होती .. तिच्या बोलण्याने एवढं तर कळलं होतं की,, ती अजून दोन तास तरी सोबत आहे.. बघताच क्षणी त्याला ती आवडली होती..
तेवढ्यात कर्र,,,कर्र,,, आवाज होत बसला ब्रेक लागला... तसे उभे असलेले प्रवासी धाडकन एकमेकांना आदळले..आणी बसलेले पुढच्या सीटला.... चला लवकर उतरा खाली.. काय खायचं प्यायचं असेल, ते करून घ्या.... गाडी फक्त वीस मिनिट इथं थांबणार आहे... परत दोन तास तरी गाडी कुठेही थांबणार नाही... कंडक्टर असं ओरडून ओरडून सगळ्याना सांगत होता...तशी सगळीच बस रिकामी झाली... सगळे जण बसून आणि उभे राहून कंटाळले होते... कोणी जांभई देत पुढे जात होत तर कोणी पेंगाळत... समोरच एक ढाबा होता... त्याच्या बाजूला मोठं गार्डन होतं... पण ऊन असल्याने सगळे आत गेले.... तुम्हाला जे पाहिजे ते खा..... मी आलोच असं म्हणत रोहन निघून गेला.. ती त्यांच्या पासून थोड्या अंतरावर बसली होती... तिला बघून तो परत आला.. तू पण खाऊन घे रोहन.. जायचंय आपल्याला... ती सहज दिसेल अशा प्रकारे तो बसला... लवकर लवकर जेवण करून ते बसमध्ये गेले.. काही माणसं आधीच येऊन बसली होती..थोड्या वेळाने उरलेली माणसं पण आली.. . आपल्या आजू बाजूला बघा.. सगळेआलेत का?? कंडक्टरने विचारले... कोण काही म्हणाल नाही.. पण ती अजून आली नव्हती... कुठे असेल ही.. रोहन त्याच विचारात असताना ती धावतच आत आली... धापा टाकत टाकतच ती जागेवर बसली... अजून कोण राहिलय का...? कंडक्टरने बेल वाजवली आणि गाडी पुन्हा रस्त्याला लागली... तिला बघून त्याला बर वाटलं... मागे वळून त्याला पाहून ती किंचित हसली... तो तर तिला बघत बसला... त्याला विश्वासच बसत नव्हता... म्हणजे ही पण.... मनातल्या मनातच तो खुश झाला... हसली म्हणजे पटली ना भावा... अस म्हणत प्रवीण गाणं म्हणू लागला... एक नजर मैं भी प्यार होता है,,, मैंने........ तो पुढे बोलणार तितक्यात रोहनने हात ठेवून त्याच तोंड बंद केलं... ते बघताच त्रिवेणी हसू लागली,,, त्याने लाजून मान खाली घातली....
*क्रमशः...*
मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की... "प्रवास" ह्या कथेतून तुम्हाला हवी असणारी भीती आणि रोमांचक थरार लगेच तरी अनुभवता येणार नाही... प्रवासामधील त्यांची मैत्री, भेट आणि त्यांचं प्रेम ह्या सर्वाचं वर्णन करण्यासाठी मला कथेचे दोन भाग तरी त्यासाठी द्यावे लागतील.. तसेच तुम्हाला ही कथा नक्की आवडेल...
Image may contain: tree, outdoor, text and nature

एक सत्य अनुभव (जरासा वेगळा) ( Marathi Stories)

एक सत्य अनुभव (जरासा वेगळा)

- अभिषेक अरविंद दळवी

एक अनुभव सांगतो ,याला काय म्हणायचं ते ठरवा तुम्ही.माझ्या घरी किचन च्या बेसिन जवळ एक बल्ब आहे , जो बरेच दिवस चिकचिक करत होता.

आजही मी पाणी प्यायला गेलो तेंव्हा तो बल्ब चिकचिक करतच होता. मी सहज गमतीच्या मूड मध्ये म्हणालो," तुझ्या अस्तित्वाला मी चॅलेंज देतो, हे माझं घर आहे, गेट आउट" हे सगळं मी हसत हसत म्हणालो. पण खरी मजा पुढे आहे. जेंव्हा हे वाक्य मी बोललो तेंव्हा बल्ब चिकचिक करायचा थांबला. माझ्या काळजात धस्स झालं. मी म्हटलं बोलाफुलाला गाठ पडली असेल, आणि स्वतःची समजूत घालून वळणार इतक्यात तो बल्ब पुन्हा चिकचिक करू लागला.

मी चेव आल्यासारखी गर्जना केली. (ही गर्जना अर्थात मनात होती, नाहीतर साडे अकरा वाजता बल्ब समोर आरडाओरड केली म्हणून घरच्यांनी मला वेड्यात काढलं असतं.) "तू जे कुणी किंवा जे काही असशील ते इथून निघून जा. हे घर माझं आहे. गेट आउट. " बल्ब पुन्हा स्तब्ध! काहीतरी गडबड आहे खरी हे मनात यायला आणि बल्ब पुन्हा चिकचिक व्हायला एकच क्षण जुळला. मी तडक काल भैरवाष्टकम सुरू केलं. पहिला श्लोक पूर्ण झाला आणि बल्ब नॉर्मल झाला. मी पाणी हातात घेतलं. तोंडाने श्लोक चालूच होते. अष्टक फ्रँ झाल्यावर ते पाणी त्या जागेवर शिंपडलं. बल्ब आता नॉर्मल झाला होता. नंतर मी दोनदा चालू बंद करून पण पाहिला , एकदम ओके!
मी आईला याबद्दल जास्त खोलात न जाता बल्ब च्या चिकचिक होण्याबद्दल जुजबी चौकशी कर्ली. तिच्या म्हणण्याप्रमाणे तो बल्ब जुना होता , आणि असा बंद होण्यापूर्वी बल्ब तसे रिऍक्ट होतात. मला सगळं पटलं, पण एक शंका मनात राहिली. बोलफुलाला गाठ एकदा पडेल, दोनदा पडेल पण सारखी कशी पडेल ? आणि जर बल्ब बिघडलाच होता तर स्तोत्र पूर्ण झाल्यावर तो नॉर्मल कसा झाला ? असो , सृष्टीची कोडी अजब असतात . तुमच्या घरात असा चिकचिक करणारा बल्ब नाहीये ना????

अभिषेक अरविंद दळवी
No automatic alt text available.

रविवार, 2 दिसंबर 2018

" माझ्या मुलांना एवढा डबा द्याल का, भूक लागलीय त्यांना " (Marathi Stories)

" माझ्या मुलांना एवढा डबा द्याल का, भूक लागलीय त्यांना "

- समीर गायकवाड

गोष्ट पावसाळयातील आहे. आषाढातील एका पावसाळी दिवसांत बहुधा ऑगस्टचा महिना अखेर असावा, घराकडे निघायला मला बराच उशीर झाला होता. त्या दिवशी पुण्याहून सोलापूरकडे येणारी कन्याकुमारी एक्स्प्रेस खूपच उशिरा आल्याने स्टेशनवरून निघायला रात्रीचे दिड वाजले होते. पार्किंग लॉटमध्ये सकाळी जाताना ठेवलेल्या गाडीच्या सीटवर जमा झालेली धूळ हाताच्या एका फटक्यात उडवून काहीशा त्राग्याने बाईक स्टार्ट केली. जुना पुणे नाका क्रॉस करून पुढे गेलो. शहरी वसाहतीचा भाग संपला. पावसाळी दिवस असल्याने रस्ता निसरडा झाला होता.

मध्यरात्र उलटून गेलेली असल्याने क्वचित एखादी दुसरी लहान सहान दुचाकी रस्त्यावर दिसत होती. हायवेचे काम नुकतेच पूर्ण झालेले असल्याने चकाचक टार रोडवरून सुंइक आवाज करत कट मारत, ओव्हरटेक करत गाड्या पळवण्याचे काम मोठे जोमाने चालू होते. मोठाले मालट्रक. अजस्त्र कंटेनर आणि वेगाने धावणारया कार्सनी रस्त्याचा जणू ताबाच घेतला होता. या रहदारीचा काही नेम नाही असा विचार करत मी जपूनच साईड रोडवरून गाडी चालवत होतो. (REPOST)
बोचरी थंडी अंगात शिरून अंगभर गारवा मुरवत होती. सुंसुं आवाज करत वारे कानाशी लगट करत होते. सोलापूर मागे पडून आता बराच वेळ झाला होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या हॉटेल्समधील लाईटस बंद झाले होते, काही ठिकाणी बाहेरचे दिवेही मालवलेले होते. एखाद दुसरा ढाबा फिकट पिवळसर उजेडात जाग असल्याची साक्ष पटवून देत होता. लॉंग ड्राईव्हवरील मोठाले ट्रक्स छोट्याशा विश्रांतीसाठी रस्त्याच्या कडेला वा अशा ढाब्यात थोड्या वेळासाठी थांबत असल्याने तिथे तुरळक गर्दी दिसत होती. एखाद्या छोट्याशा टपरीवजा चहाच्या ठेल्यावरील भरारा आवाज काढणारा निळ्या पिवळ्या ज्योतीचा स्टोव्ह आणि त्यावर ठेवलेली जर्मनची चहाची किटली उगाच लक्ष वेधून घेत होती. अवती भोवती तोंडाला मफलर गुंडाळून पेंगुळलेल्या झोपेला दूर सारण्याच्या अनिच्छेने दोन चार माणसं हाताची घडी घालून उभी होती.

इकडे तिकडे बघण्याचे टाळत पुढे बघून गाडी चालवण्याचा प्रयत्न करत होतो. पण निरीक्षणाची सवय काही केल्या जात नसल्याने किती जरी टाळले तरी इकडे तिकडे हटकून लक्ष जात होते. त्या नादात मला लक्षातच आले नाही की, एकाएकी रहदारी अगदीच तुरळक होत गेली आणि रस्ता निर्मनुष्य होत गेला. काही वेळातच गावाकडचा रस्ता लागणार असल्याने मी गाडीचा वेग बऱ्यापैकी कमी केला.

तोच दूर अंतरावर एक कार रस्त्यावरच उभी असल्याचे लांबुन दिसले, शिवाय कारच्या उजव्या बाजूस ड्रायव्हींग साईडला एक जोडपं उभं होतं. बहुधा त्यांनी मला पाहिलं असावं गाडी थांबवण्यासाठी ते अंगठ्याची खुण करत होते. दुरून काही स्पष्ट दिसले नाही मात्र जवळ येताच ध्यानात आले की, एक अलिशान पांढरी शुभ्र स्कोडा गाडी अगदी रस्त्यातच उभी होती. तिच्याबाहेर श्रीमंतीच्या खाणाखुणा अंगावर असणारं, देखणं रुबाबदार मध्यमवयीन जोडपं उभं होतं. बहुधा ते बरयाच वेळापासून इथं उभे असावं. त्यांनी माझ्याआधीही काहींना विनंती केली असावी पण कुणी थांबले कसे नाही याचे मला जरा नवल वाटले. खरे तर मला फार उशीर झाला होता, घरातले सगळे जण नेमके गावाकडे गेलेले होते. गावाकडे जाऊन तब्बल एक महिना उलटला असल्याने कधी एकदा गावातल्या घरी जाऊन पलंगावर पाठ टेकवतो असे झाले होते. पण समोरील गोंधळात टाकणारे दृश्य बघून आणि मदतीचा स्थायीभाव अंगी जरा जास्तच असल्याने माझ्या नकळत मी गाडीचे ब्रेक्स दाबले देखील .....
त्यांच्या अगदी जवळ गेल्यावर मी बाईक आधी रस्त्याच्या कडेला घेतली. कधी कधी बारा भानगडी देखील हायवेवर घडत असल्याने अगदी सावधपणे त्यांना विचारले,"काय झाले सर ? काही अडचण ?"
माझ्या प्रश्नावर त्यांनी एकमेकाकडे पाहिले. तो पुरुष काही बोलणार त्या आधी ती स्त्रीच बोलली,
"काही नाही ओ भाऊ आमची कार बंद पडलीय. खरे तर आम्ही पुढे गेलो होतो. पण आमच्या मुलांनी हट्ट केल्याने आम्ही पुन्हा मागे फिरलो आहोत."
त्यांनी काय सांगितले मला काहीच कळले नाही. माझ्या प्रश्नार्थक चेहऱ्याकडे बघत तो पुरूष उत्तरला.
"त्याचे काय झाले, आम्ही मुंबईचे आहोत. आमच्या मुलांना आणि भावाच्या कुटुंबाला सोबत घेऊन आम्ही दोन कारमधून एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी सोलापूरला आलो होतो. रात्री निघण्यास उशीर झाला. मुले लहान आहेत, त्यांना भूक लागली. मग वाटेत लागणाऱ्या टोल प्लाझापाशी थांबावे अशी त्यांची इच्छा होती, पण नेमके आजच टोलप्लाझावरील हॉटेल बंद होते. मग आम्ही त्यांच्यासाठी पुन्हा मागे फिरून पार्सल आणण्यासाठी मागे वळलो होतो. मुले भावाच्या गाडीत झोपी गेली असतील, त्यांना भूक लागली असेल. भाऊ आणि वाहिनी देखील दिवसभराच्या ताणाने थकले असतील. ते ही झोपी गेले असतील. त्यांची तरी झोपमोड का करावी म्हणून आम्ही त्यांना कळवले नाही. पण काही वेळात गाडी सुरु झाली नाही तर त्यांना कळवावे लागेलच. होय ना गं !"
शेवटचे वाक्य बोलताना त्या माणसाचा कंठ दाटून आल्यासारखे वाटले, सगळे एका दमात बोलून झाल्यावर त्याने कारचे दार उघडले. दोन तीन कॅरीबॅगमध्ये काही तरी खाद्यपदार्थ होते, डॅशबोर्ड मधील ड्रॉवर खोलून त्याने आतील एका नक्षीदार टिफिनमध्ये त्या कॅरीबॅग ठेवल्या. टिफिन माझ्या हाती दिला आणि भावाच्या बीएमडब्ल्यूच्या गाडीचा नंबर सांगितला. "टोलप्लाझापाशी गाडी थांबली असेल त्यांना एव्हढे पार्सल नेऊन द्या हो. माझी मुले भुकेली असतील हो."
अगदी काकुळतीला येऊन त्या स्त्रीने सांगितले. फिकट निळसर साडी आणि त्यावर मॅचिंग ब्लाउज, बांगड्या तिला खुलून दिसत होत्या. त्या चांदण्या रात्री तिच्या कपाळावरचे लालभडक कुंकु चांगलेच उठून दिसत होते. वाऱ्यावर भुरभुरणारे केस कपाळावर येत होते, इतक्या गार हवेत देखील तिच्या कपाळावर जमा झालेले घर्मबिंदू मला उगाच कासावीस करून गेले. मंगळसूत्राशी चाळा करत पदर सावरत एका अनामिक अस्वस्थतेने ती बोलत होती.
"अहो त्यात काय एव्हढे ? मुलांचा डबा हातोहात नेऊन देतो. तुम्ही त्याची काळजी करू नका. कार सुरु होत नसेल तर माझ्या ओळखीच्या मॅकेनिकला बोलावू का?"
माझ्या अनपेक्षित प्रश्नाने ते दोघेही किंचित गांगरले. त्यामुळे मीच बोलता झालो.
"नाही तर तुम्ही हायवे पोलिसांना कळवा ते तुम्हाला मदत करतील, असं हायवेवर थांबणं धोक्याचे आहे. शिवाय तुमच्या सोबत बाईमाणूस आहे."
माझ्या ह्या उद्गारांनी ते अजूनच हतबल झाल्यासारखे वाटले. मग मी न राहवून त्यांना म्हटले,
"माझे घर लहान आहे, पण इथून जवळ आहे. तुम्ही, तुमची मुले आणि भाऊ - वाहिनी सगळेच जण आमच्या घरी थांबा. मुक्काम करून गाडीचे काम करून सकाळी तुमच्या मुंबईला रवाना व्हा !"
"आता त्याचा काय उपयोग...बराच उशीर झालाय ... डबा थंड होईल... आधीच सगळं संपलंय... निघा लवकर... आम्ही निघतोच आहोत असं सांगा त्यांना.."
माझे बोलणे अर्ध्यात तोडत ती स्त्री कातर आवाजात अर्धवट तोंडात पुटपुटत बोलली. शेवटचे शब्द बोलताना तिचा आवाज खूपच कातर झाल्यासारखा वाटला.
मग मीही अधिक पाल्हाळ न लावता तो टिफिन घेतला, हँडलला असणाऱ्या पिशवीत ठेवला. त्या दोघांनी हात जोडले तसे मीही यंत्रवत हात जोडले. का कुणास ठाऊक पण त्या स्त्रीच्या डोळ्यात पाणी तरळल्यासारखे वाटले. मी तिथून निघालो खरं पण पुढे काही अंतरावर रस्त्यात उभ्या असणाऱ्या ट्रककडे पाहून उगाच मनात वाईट विचार चमकून गेले....
खरे तर माझे गाव टोलप्लाझाच्या अलिकडे होते. पण त्या जोडप्याने इतके कळवळून सांगितल्याने आणि त्यांचे कारणही रास्त वाटल्याने मी गावाचा रस्ता लागूनही गावाकडे न वळता वेगाची झिंग असणारया निर्जीव भकास रस्त्यावरून गाडी चालवणे मला मुळीच आवडत नाही. माझी आपली पाऊलवाटच बरी, वाटसरूशी बोलणारी, त्याच्या सुखदुखात सामील होणारी. त्याला आपलंसं करणारी अन आईच्या कुशीची ऊब देणाऱ्या पाऊलवाटेची सर ह्या डांबरी हायवेला कधीच येणार नाही हे माझे विचारांचे नेहमीचे पालुपद डोक्यात घोळवीत मी पुढे मार्गस्थ झालो. काही वेळात सावळेश्वरच्या जवळचा टोलप्लाझा आला. माझ्या गावापुढे असणारया ह्या गावाचे नाव मला खूप आवडते. सावळेश्वर ! सावळा ईश्वर, श्रीकृष्ण ! गावाचे नाव साक्षात श्रीकृष्ण !..
टोलप्लाझाजवळ आल्यावर मी जरा चकितच झालो कारण तिथले हॉटेल चालू होते. बाहेरील साईन बोर्डच्या लाईट्स चालू होत्या. हॉटेलच्या आजूबाजूस किंवा विरुद्ध दिशेसही काळ्या रंगाची बीएमडब्ल्यू कार दृष्टीस पडली नाही. मी जरा विचारात पडलो. म्हटले हेच तिकडे गेले की काय ? विचार करतच हॉटेलबाहेर गाडी उभी केली. हँडलला लावलेली पिशवी हातात घेऊन लगबगीने हॉटेलच्या पायरया चढून 'ते लोक' आत आहेत का ते पाहण्यासाठी डल आत डोकावून पाहीले. पण आत फक्त एकदोन वाट आणि वेळ चुकलेले ग्राहक होते. त्या जोडप्याने सांगितल्यापैकी दुसरे जोडपे वा कुणी लहान मुले नव्हती. कदाचित मी इकडे येत असताना हे लोक विरुद्ध दिशेने माघारी फिरले असतील अशी शक्यता मनात धरून मी इकडे तिकडे नजर फिरवीत उभा राहिलो.
तोंडावर झोपेचा नकाशा वागवत जांभया देत एक वेटर कोपऱ्यातल्या टेबलापाशी बसून होता. कॅश काउंटरवरील साहेबराव पेंगेच्या आधीन झाला होता. त्याच्या समोरील बरणीवर हात मारत आवाज दिला - '"अरे, साहेबराव उठ की लेका .."
या जोरदार हाळीने तो जरासा दचकून जागा झाला.
एकवार त्याने हातातील घड्याळाकडे पाहिले, भिंतीवरील घड्याळाकडे पाहिले अन मग पहिल्यांदा बघत असल्यागत त्याने मला खालपासून वरपर्यंत न्याहाळले. माझ्या हातातील पिशवीकडे लक्ष जाताच तो एकदम दक्ष स्थितीत आला. "अरे आत गिऱ्हाईक येऊन बसलंय, वेटर झोपा काढतोय आणि मालक घोरत बसलाय...कसं चालवणार रे हॉटेल ? आणि हॉटेल कधी उघडलंस ? तासा दोन तासाआधी बंद होतं का हॉटेल ? इथं थांबलेली माणसं कुठं गेलीत ? की आजच्या रात्रीचं जेवण बनवायचं थांबवलंय का आपला वस्ताद आला नाही ? नेमकं काय झालंय आज ? का तुला गिऱ्हाईक ज्यादा झालंय ?"
माझ्या एकाही प्रश्नाचे उत्तर न देता साहेबराव माझ्या तोंडाकडे मख्ख नजरेने बघत बसला होता. मला जरा रागच आला. "अरे घुम्यागत बघत काय बसलास ? बोल की जरा !" असं खडसावून देखील त्यानं विशेष प्रतिसाद दिला नाही. त्या उलट आतल्या पोरयास माझ्यासाठी कडक चहा ठेवायला सांगितला ! आता मात्र मी जरा चमकलो. माझ्याकडे बघत साहेबराव गंभीर चेहरा करत घोगऱ्या आवाजात बोलला, "बापू झालं का बोलून ? का अजून काही विचारायचं आहे ? मी काही सांगू का तुम्हाला ? आधी हातातली पिशवी खाली ठेवा !" त्याच्या ह्या थंड पवित्र्याने मी सर्दच झालो...
माझ्या चेहऱ्याला न्याहाळत साहेबराव बोलता झाला. "बापू, तुमच्या जवळ कुणी जेवणाच्या पार्सलची पिशवी दिली आहे का ?"
मला जरा आश्चर्य वाटले. पुन्हा मनात आलं की आपल्याआधी किंवा नंतर त्या जोडप्याने आणखी कुणाजवळ पार्सल दिले की काय ? बहुधा तसेच झाले असेल. ते पार्सल घेऊन ही मंडळी इथून पुढे गेली असतील. ह्या विचाराने थोडेसे हायसे वाटून मी मान डोलावली. त्यावर साहेबरावच्या चेहऱ्यावर थोडेसे भीतीचे भाव उमटले. कपाळावर आठ्यांचे जाळे गोळा झाले. घसा खाकरत त्याने पुढचा प्रश्न टाकला.
"बघू कुठे आहे ती पार्सलची पिशवी ? जरा दाखवा बर मला !"
आता ह्याला त्याच्याशी काय असेल बरं असा विचार मनात आला. पण पार्सल दाखवाच असे म्हणतोय तर त्याला दाखवायला काय हरकत असा विचार करत मी पिशवीत हात घातला. आणि दचकलोच !
त्या जोडप्याने दिलेला टिफिनचा डबा जागेवर नव्हताच. म्हटलं वाटेत डबा पडला की काय ? मग डबा पडल्याचा आवाज कसा काय आला नाही ? मग डबा गेला कुठे ? मी पिशवीत वरपासून खालपर्यंत हात घालून चाचपू लागलो. एकेक करून पिशवीतले सगळे साहित्य बाहेर काढले पण तो टिफिन काही जागेवर नव्हता. मनात विचार आला,समजा ते लोक इथे आले तर काय उत्तर द्यायचे ? त्या जोडप्याचे भाऊ - वाहिनी आपल्याला शोधायला पुढे मागे गेले असतील अन ते आता कशी क्षणात इथे आले तर काय करायचे ? त्या भुकेल्या लहानग्या जीवांनी आई बाबांनी पाठवलेल्या पार्सलमधील चीजवस्तू खायला मागितल्या तर काय करायचे ?
ह्या सगळ्या विवंचना माझ्या चेहऱ्यावर साफ झळकल्या असाव्यात. त्यामुळेच की काय साहेबराव अगदी शांतपणे माझ्याकडे बघत होता.
माझ्या अस्वस्थतेला निरखत तो जड आवाजात बोलला.
"बापू तुमच्या कडे कुठला टिफिन कुणी दिलेलाच नाही ! हा एक भास आहे ! मागील दहा दिवसापासून हे असंच चालू आहे. रोज अपरात्री कुणी ना कुणी येतो आणि त्यांनी दिलेले टिफिन घ्या म्हणतो पण हाती काहीच नसते !"
साहेबरावच्या ह्या खुलाशाने मी भेदरून गेलो.
त्याला म्हटलं अरे असे कसे काय शक्य आहे ? भास कसे म्हणतोस तू ? मी तर त्यांच्याशी काही वेळापूर्वीच बोलून आलो आहे. तेही थोड्या वेळात येतीलच !...."
माझे वाक्य अर्ध्यात तोडत साहेबराव बोलला, " आपले हॉटेल बंद आहे, काळ्या रंगाच्या बीएमडब्ल्यूत त्यांचे भाऊ आणि वहिनी इथे टोलप्लाझापाशी बाहेर कार थांबवून उभे आहेत. त्यांच्या सोबत दोन लहान मुलं आहेत. ते मुंबईहून सोलापूरला कौटुंबिक कार्यक्रमासाठी आले होते. निघायला उशीर झाला होता. मुलांना भूक लागली, मग टोलप्लाझा वरील हॉटेल बंद असल्याने मुले भावाच्या गाडीत ठेवून ते पार्सल आणायला माघारी फिरले. काही अंतरावरील ढाब्यावर गेले. पार्सल घेतले. ढाब्यापासून काही अंतर जाताच रस्त्याच्या मधोमध त्यांची गाडी बंद पडली. त्यांनी गाडी चालू करण्याचा प्रयत्न केला पण गाडी सुरु होत नव्हती. भाऊ आणि वहिनी झोपले असतील म्हणून त्यांनी त्यांना फोन केला नाही. आता सुरु होईल मग सुरु होईल म्हणून हायवे पोलिसांना कळवले नाही. गाडी सुरु होईपर्यंत पार्सल कुणाजवळ तरी पुढे पाठवून द्यावे म्हणून त्यांनी एखादा वाटसरू दिसतो का हे पाहण्यास सुरुवात केली आणि तुम्ही त्यांच्या नजरेस पडलात. तुम्हाला बघून त्यांनी अंगठ्याने गाडी थांबवण्याची खुण केली. इतक्या रात्री काय झाले असेल हा विचार करत तुम्ही आपसूक गाडी थांबवलीत. त्यांच्याशी बोलून झाल्यावर त्यांनी एका नक्षीदार टिफिनमध्ये ते पार्सल घालून दिले. ते घेऊन तुम्ही पुढे निघून आलात. इथे येऊन चकित झालात कारण इथे तर कुणीच नाही !"
साहेबराव एका दमात एका लयीत सांगत गेला आणि मी आ वासलेल्या चेहऱ्याने त्याच्याकडे दिग्मूढ होऊन बघत त्याचे बोलणे ऐकत राहिलो !
त्यावर काय बोलावे हे मला सुचलेच नाही. जणू मी थिजून गेलो होतो.
"बापू, तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे सगळं मला कसे काय ठाऊक ?"
साहेबराव मला काहीतरी विचारत होता आणि माझे त्याच्या बोलण्याकडे लक्ष नव्हते. नेमके काय झाले आहे हेच मला कळत नव्हते. इतक्यात गरमागरम वाफाळता चॉकलेटी चहा आला. साहेबरावने वेटरला तिथून जाण्यास हातानेच खुणावले. घरून आणलेली कॅश काउंटरच्या खाली ठेवलेली पाण्याची बाटली त्याने वर काढली. एका ग्लासात पाणी ओतून ग्लास माझ्याकडे सरकावत त्याने हलकेच माझ्या खांद्यावर थोपटले. 'बापू चहा घ्या थंड होतोय, हवेत जरा गारवा आहे...मी सगळं सांगतो तुम्हाला....आधी जरा चहा तरी घ्या..'
त्याच्या उद्गाराने मी जरा भानावार आलो. मनगटातील घड्याळाकडे बघितले. अडीच वाजून गेले होते. इतक्या रात्री मी कधीच चहा प्यालो नव्हतो. ती रात्र मात्र अपवाद होती. बाहेर येऊन तोंडावर पाण्याचे दोन सपकारे मारले. आत वॉश बेसिन असूनही मी तोंड धुण्यास बाहेर आलो नव्हतो. खरे तर पुन्हा एकदा बाहेर कुठे बीएमडब्ल्यू दिसते का हे पाहण्यासाठी मी बाहेर आलो होतो. साहेबराव माझे बारकाईने निरीक्षण करत आहे हे लक्षात येताच मी आत वळलो. रुमालाने तोंड पुसून होताच चहाचा कप ओठाला लावला. झोप तर आधीच पळाली होती. डोक्यात प्रश्नांचे अन विचारांचे काहूर माजले होते. त्याला ह्या चहाने थोडीशी चालना मिळाली. आता चहा पिऊन झाल्यावर साहेबराव काय सांगतो ते ऐकण्यास मी पुरता अधीर होऊन गेलो होतो.......
माझा चहा पिऊन होताच साहेबरावने बडीशेप पुढे केली. त्याला मी हातानेच अडवले. त्यासरशी पुन्हा एकदा बळेच घसा खाकरत तो बोलता झाला. "मी काय सांगतो ते ध्यान देऊन ऐका बापू .."त्याने अशी सुरुवात करताच मी अगदी कान टवकारून बसलो.
"कदाचित तुम्हाला माहिती नसेल किंवा तुम्ही गावात नसल्यामुळे तुमच्या कानावार आले नसेल. दहा दिवसापूर्वी आपल्या आत्माशांती ढाब्यापाशी एक अपघात झाला."
माझ्या अंगावर आता शहारे आले होते. साहेबराव पुढे सांगत होता...
"त्या दिवशी रात्री बहुधा साडेअकरा बाराची वेळ असावी. आपल्या हायवेला एक बाराचाकी ट्रक रस्त्याच्या मधोमध बंद पडला होता. त्यांनी हायवे पोलिसांना क्रेन साठी कळवले होते. पण क्रेन येण्यास काही अवधी तर लागतोच ना !'
मी यंत्रवत मान डोलावली.
"तर क्रेन येण्यापूर्वी चाकाखाली ठेवण्यासाठी रस्त्याच्या कडेला असणारे दगड गोळा करण्यासाठी व झाडाचे फाटे तोडून ट्रकच्या कडेने ठेवण्यासाठी करण्यासाठी ड्रायव्हर क्लीनर ट्रकमधून उतरून थेट रस्त्याच्या कडेला गेले. त्या नंतर काही क्षणातच रस्त्याच्या मधोमध बंद पडलेल्या मालट्रकचा अंदाज न आल्याने पांढरया रंगाची एक अलिशान स्कोडा गाडी त्या ट्रकला वेगाने येऊन धडकली. टक्कर इतकी जोरात होती की स्कोडा गाडी ट्रकच्या चेसीखाली जाऊन अडकली !'
साहेबरावच्या ह्या वाक्याने माझ्या काळजाचे ठोके चुकले.
"कारमध्ये पुढच्या सीटवर सोलापूरहून मुंबईच्या दिशेने जाणारे मोहिते दांपत्य जागीच ठार झाले. त्या दिवशी मी सासरवाडीला गेलो होतो. वस्तादपण सुट्टीवर होता शिवाय पावसाळी दिवस असल्याने हॉटेल बंदच ठेवलेले होते. त्यामुळे मी काही त्या लोकांना बघू शकलो नाही. मात्र नंतर कळले की मोहिते कुटुंब दोन कारमधून मुंबईच्या दिशेने चालले होते. मुलांना फार भूक लागलेली असल्याने ते टोलप्लाझापाशी आले. नेमके त्या रात्री हॉटेल बंद असल्याने त्यांनी पुढे जाण्याऐवजी एक गाडी टोलजवळ साईडला उभी केली. मुले त्याच गाडीत त्यांच्या भावाच्या गाडीत बसवली अन ते दोघे मुलांना पार्सल आणण्यासाठी काही अंतरावरील आत्माशांती ढाब्याकडे वळले. पार्सल घेऊन वेगाने पुढे येताना त्यांना रस्त्यातील ट्रकचा अंदाज आला नाही. ते त्या ट्रकवर जाऊन आदळले. त्यात जागेवरच त्यांचा मृत्यू झाला. कारमधील हवेचे फुगे का काय म्हणतात ते देखील उघडले नव्हते. गाडी इतक्या जोरात आदळली की हवेचा दाब बसून पुढची दोन्ही दारे तुकडे होऊन उडाली होती.."
साहेबराव वर्णन करून सांगत होता आणि मी मेंदू गोठल्यागत ऐकत बसलो होतो. काही वेळापूर्वी आपण ज्यांच्याशी बोललो, ज्यांना पाहिले, ज्यांच्याकडून एक डबा घेतला ती खरी माणसे नव्हती. आपण जिथं थांबलो होतो ती गाडी देखील खरी नव्हती. तो सगळा एक आभास होता. ह्या विचाराने माझ्या अंगावर थरारून काटा आला.
"त्या दिवसापासून रोज रात्री एक का होईना मोटरसायकलवाला इथं आपल्या हॉटेलवर येतो आणि गाडीतल्या जोडप्याने न दिलेले टिफिन देण्याचा प्रयत्न करतो. इथल्या त्या नातेवाईकांना शोधायचा प्रयत्न करतो. मग सत्य ऐकताच चक्रावून जातो. मला तर कळेनासे झालेय की असे किती दिवस चालणार ? भीतीने कुणी मरून जाऊ नये म्हणजे मिळवले..." साहेबराव बोलतच होता...
"अरे ते जाऊ दे सोड... त्या जोडप्याचे पुढे काय झाले ?" त्याची बोलण्याची तार अर्ध्यातच तोडून मी त्याला विचारले.
"मग काय होणार ? त्यांच्या अपघातानंतर काही क्षणात ट्रकच्या ड्रायव्हरने पोलिसांना कळवले. क्रेन सोबत घेऊन पोलिस तिथे आले. त्यांच्या खिशातील मोबाईलवरून फोनद्वारे टोलप्लाझा जवळ थाबलेल्या त्यांच्या भावाशी संपर्क झाला. पंचनामा झाल्यावर दुसऱ्या दिवशी पोस्टमार्टेम सह सर्व सोपस्कार पार पडले. त्या नंतर त्यांचा अंत्यविधी त्यांच्या मूळ गावी पार पडला इथवरची माहिती माझ्याकडे आहे.....आता जास्त विचार न करता बापू सरळ घरी जावा...गाडी सावकाश चालवा... मन अस्थिर असंल तर कुणाला सोबत देऊ का ?" साहेबरावनं असं विचारताच माझी विचारांची तंद्री भंगली.
'सोबत कुणी नको एकट्यानेच व्यवस्थित जातो' असे सांगून मी काही वेळ तिथेच रेंगाळून तिथून काढता पाय घेतला. काही वेळात घरी पोहोचलो. अंथरुणावर अंग टाकले खरे पण चित्त स्थिर नव्हते. डोळ्यापुढून ते जोडपे जात नव्हते. त्या जोडप्याचा आवाज कातरल्यासारखा का वाटत होता, त्या महिलेच्या डोळ्यात पाणी आल्यासारखे का वाटत असावे हे सर्व आता लक्षात आले. पण राहून राहून एकच प्रश्न मनात येत होता की त्यांना भेटणारया व्यक्तीस अडवून ते टिफिन का देत असावेत ? त्यांना काही सांगायचे किंवा सुचवायचे असेल का ? हा प्रश्न काळजात घर करून राहिला. सकाळी उठल्यावर घरातील सर्व लोकांना हा प्रसंग सांगितला तर भूताटकी झाली वा भानामती झाली असले काही तरी थोतांड सुरु होईल या हेतूने मी गप्प बसणे पसंत केले.
सकाळची कामे आटोपून काही त्रोटक भेटीगाठी घेऊन रात्री माझ्यासोबत ज्या ठिकाणी ती घटना घडली होती तिकडे कूच केले. काही वेळातच तिथे पोहोचलो. शाळकरी मुलांना घेऊन जाणाऱ्या टमटम रिक्षा, मालवाहतूकीची वाहने आणि एसटी बसेस -सिटी बसेसची बरयापैकी वर्दळ होती. थोडीशी थंड हवा अंगाला झोंबत होती. वाटेने भेटणारया परिचितांचा रामराम स्वीकारत 'त्या' ठिकाणी पोहोचलो. रस्त्याच्या कडेला गाडी लावताच मी हादरलो. कारण रात्रीच्या अंधारात रस्त्याच्या बाजूला शेतात नेऊन टाकलेली अपघातग्रस्त कारकडे माझे लक्ष गेलेच नव्हते ! ती गाडी अद्याप तिथेच चक्काचूर झालेल्या अवस्थेत होती. मी कुतूहल म्हणून गाडीजवळ गेलो/ कारच्या बॉनेटचा सर्वनाश झाला होता. पुढचे सीट पूर्णतः चेमटून गेले होते. काचांचा चुरा आत पडून होता. मागचे दरवाजे दबून गेलेल्या अवस्थेत होते. पुढच्या दाराचे तुकडे तिथेच गोळा करून टाकलेले होते. पुढच्या सीटच्या सांदीत निळसर बांगड्यांचे काही बारीक तुकडे पडून होते.
माझे मन ज्याचा शोध घेत होते अशी एक वस्तू तिथेच आसपास असायला हवी होती असे मला राहून राहून वाटत होते. अपघात झाला त्या क्षणी या दोघांच्या मनात काय विचार आले असतील ? त्यांचा जीव जाताना त्यांना काय वाटले असेल ? त्या दिवशी जर साहेबरावचे हॉटेल बंद नसते तर असे जर तरचे अनेक प्रश्न मनात चमकून गेले. आणि तितक्यात एका दूरवरून चकाकणारया एका वस्तूकडे बघून मी थक्क झालो ! दुरून चकाकणारी ती वस्तू म्हणजे काल रात्री माझ्या हाती दिलेल्या टिफिनची कार्बन कॉपी होती म्हटलं असतं तरी चाललं असतं. मी जवळ जाऊन पाहिलं तर तो काल रात्री माझ्या हाती दिलेल्या नक्षीदार टिफिनसारखाच दोन ताळी चपटा डबा होता. डबा उघडून पाहिला तर उग्र आंबुस वासाचा भपकारा नाकात घुसला. डब्यातील अन्न कुजून गेले होते. विटल्यामुळे त्याची दुर्गंधी बाहेर पडली. अपघात घडला त्या क्षणी बहुधा हा डबा त्या अभागी स्त्रीच्या हाती असावा कारण अपघात होताच अजस्त्र वायूदाबामुळे तिच्या बाजूचे दार तुकडे होऊन उडून पडले होते. तिला जोराचा धक्का बसला असावा आणि निमिषार्धात तिच्या हातातला डबा उडून गेला असावा. लांबून फेकला गेला असल्याने तो कलंडून शेतात माळावर झुडपात पडला होता त्यामुळे त्याच्याकडे कोणाचे लक्ष गेले नसणार.
आता मला माझ्या प्रश्नाचे उत्तर सापडले होते.....
दुपारी तालुका पोलिस स्टेशनमध्ये फोन करून मृत मोहित्यांच्या भावाचा मोबाईल नंबर घेतला. त्यांना संपर्क साधला. ते बोलण्याच्या अवस्थेत नव्हते पण त्यांना महत्वाचे बोलायचे आहे असे सांगून मागील दहा दिवसापासून हायवेवर घडणारया घटनेबाबत थोडक्यात माहिती दिली. माझा अनुभवही सांगितला. ते ऐकून त्यांना अश्रू अनावर झाले. ते लहान मुलासारखे रडू लागले. मी त्यांना विनंती केली की त्या सर्वांनी जमल्यास दुसरयाच दिवशी अपघातस्थळी यावे, आई बापा विना पोरकी झालेली ती मुलेही सोबत आणावीत असं त्यांना कळवळून सांगितलं.
माझ्या सांगण्यावर त्यांनी विश्वास ठेवून त्यांनी दुसरयाच दिवशी येण्याचे कबुल केले. 'जवळ आल्यावर मला फोन करा' असे सांगून मी त्यांना माझा मोबाईल नंबर दिला. ठरल्याप्रमाणे दुसरयाच दिवशी भर दुपारी त्यांचा मला फोन आला. मी त्यांना इकडे तिकडे न बोलवता थेट त्या अपघात घडलेल्या ठिकाणी बोलावले. आधी त्यांनी मुलांसाठी आढेवेढे घेतले पण मी खूप मिनतवारया केल्यावर मुलांसह तिथे यायला ते राजी झाले. त्यांच्या काळ्या बीएमडब्ल्यूमधून ते त्या ठिकाणी दाखल झाले. रस्त्याच्या एकदम कडेला ते गाडीतून खाली उतरताच मी पुढे होऊन त्यांना नमस्कार करत माझी ओळख करून दिली. ते दोघे पती पत्नी उतरल्या चेहरयाने सैरभैर नजरेने इकडे तिकडे पाहत होते. मुले मात्र गाडीतच बसून होती बहुतेक कारच्या दरवाजाला असणारया फिकट काळसर काचाआडून ते अपघातग्रस्त कारकडे पाहत असावेत.
मोहिते दांपत्याने आपल्या लहान भावाच्या चक्काचूर झालेल्या कारकडे पाहिले आणि त्यांचे डोळे वाहू लागले. ते सावकाशपणे यंत्रवत चालत कारजवळ गेले. कारच्या भग्न अवशेषांवरून हात फिरवताना जणू त्यांना आपल्या लहान भावाच्या पाठीवरून हात फिरवत असल्यासारखे वाटत होते. मोहितेवहिनींनी मात्र आपल्या भावनांचा बांध खुला केला. कारजवळ येताच त्या ओक्साबोक्शी रडू लागल्या. काही मिनिटात वातावरण गंभीर झालं होतं, नकळत माझेही डोळे पाणवले. शेवटी काही वेळ तसाच निशब्द गेला. मी मोहित्यांच्या जवळ गेलो. जणू काही खूप जुनी ओळख असावी अशा पद्धतीने त्यांच्या पाठीवर हलकेच थापटले. तोवर त्यांनी स्वतःला सावरले. त्यांची पत्नी देखील शांत झाली होती. मी बाईकच्या हॅण्डलला लावलेली पिशवी काढून आणली. आदल्या दिवशी सापडलेला तो टिफिनचा नक्षीदार डबा मी घरी नेऊन लख्ख धुवून पुसून त्या पिशवीत ठेवला होता, तो डबा काढून त्यांच्या हाती देताच त्यांनी मला मिठी मारली. माझ्या खांद्यावर डोके टेकवून ते मोठमोठ्याने रडू लागले. त्यांचा आवाज ऐकून गाडीत बसलेली मुले कावरीबावरी होऊन बाहेर आली. आपल्या काकांच्या हातातील टिफिनकडे त्यांचे लक्ष जाताच 'आईं, बाबा'चा त्यांनी आर्त आक्रोश सुरु केला. मोहिते वहिनी त्या मुलांच्या जवळ गेल्या. ती मुले त्यांना अलगद बिलगली आणि सगळे कुटुंब शोककल्लोळात बुडून गेले. काही वेळानी सगळे सावरले. मुलांच्या मनातील मळभ रिते झाले होते. त्या सगळ्यांना घरी घेऊन गेलो. छोटासा पाहुणचार आटोपून पुन्हा भेटण्याच्या शर्तीवर ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले. जाताना मुलांनी 'बापूकाका, बाय बाय !' असे म्हणत हलवलेले ते चिमुकले हात डोळ्याच्या पारयात रुतून बसले. ते गेले त्या दिशेने मी ओलेत्या डोळ्यांनी पाहत राहिलो.....
त्या दिवसानंतर 'ते' अपघातग्रस्त दांपत्य कुणालाही दिसले नाही ! कदाचित त्यांना तो टिफिन मुलांच्या हाती पोहोच करून आई बाबांनी आपला अखेरचा शब्द पाळल्याचे जाणवून द्यायचे असेल वा याच जागेवर सर्वांची एक भेट घ्यावी अन मग इथून कायमचे प्रस्थान करावे असे काही तरी त्या जोडप्याच्या मनात असावे....
गावाकडे येताना मी चुकून कधी तिथे थांबलो तर माझ्या काळजातून काही सुस्कारे आपोआप बाहेर पडतात आणि एका अद्भुत समाधानाची स्मितरेषा चेहरयावर तरळते...
- समीर गायकवाड.
शेअर करण्यास हरकत नाही, पण लेखकाचे नाव वगळू नये ही अपेक्षा.
Image may contain: outdoor

शनिवार, 1 दिसंबर 2018

Marathi Ghost Story (आमावस्या आणि पाठलाग )

आमावस्या आणि पाठलाग 🏃🏃

(सत्य घटना)

मित्रांनो खुप वर्षापुर्वीची घटना आहे त्यावेळी माझ वय 16-17 वर्षाचा असेन.

मी आणि माझा मित्र,नातलग श्री महेश कुलकर्णी त्यावेळी त्याच वय 34-35 असेल आमच्या बरोबर घडलेला किस्सा.
आता दोघांची स्वभाव वैशिष्ट्य सांगतो.
Image may contain: sky and night
महेश : ऊंची 5 फुट वजन 65 पेक्षा जास्त स्थूल शरीरयष्टि असणारा,अतिशय सभ्य,सौम्य आणि शांत स्वभावाचा. थोड़ा घाबरट,गर्दी बघून वाट बदलणारा,देवावर पूर्ण श्रद्धा असणारा कलावतीमाता मंदिरात नियमित जात असे. पोथी पुराण पूजा अर्चा यात रमत असे.आई वडील बायको यांच्या म्हंणन्या नुसार वागणारा. स्कूटर वरुन फिरणारा, कुणाच्याही अध्यात मध्यात नसणारा आसा आदर्श व्यक्ति.
आणि मी : ऊंची 5 फुट 8 इंच वजन 47-48 सावळा रंग सडपातळ शरीरयष्टि.लहानपणा पासून बंडखोर वृत्ति,रोख ठोक स्वभाव, दंगेखोर,भरपूर मित्र आसणारा गर्दित घुसुन हाणामारी करणारा ऐका संघटनेच्या कार्यात आग्रेसर असणारा. मिरवणूकित हातात भगवा ध्वज घेवून सर्वात पुढे, शिवजयंतीला नंग्या तलवारी घेवून गावातंन फिरणारा आसा बेडर.स्वतःला पटेल तेच करणारा, पूर्ण धार्मिक पण कर्मकांड नपटणारा आसा यामाहा rx100 घेवून फिरणारा ,अनमेच्युअर तरुण. थोडक्यात चुकुन बामनाच्या घरात जन्माला आलेला डाकू 😎
महेश कुलकर्णी माझ्या आई कडून नातलग महेश आणि माझ्या वयात जवळ जवळ डबल अंतर स्वभाव पूर्ण पणे विभिन्न. पण दोघात एक गुण कॉमन होता तो म्हणजे वेग वेगळे पदार्थ खण्याची प्रचंड आवड म्हणजे एखाद्या पदार्थाचा आस्वाद घेण्यासाठि 200 किलोमीटर पर्यन्त जाणे म्हणजे काहीच वाटत नव्हते. महेशने आमच्या अपार्टमेंटमधे दुकान गाळा विकत घेतला होता आणि नवीन बेकरी सुरु केली होती त्यामुळे आमची लॉरेल एंड हार्डीची जोडी चांगलीच जमली होती.
पहाटे दुधाची गाड़ी येत असे म्हणुन महेश पहाटे साडेचार पाच वाजता उठुन दुकान उघडत असे दूध घेवून त्याच डिस्ट्रुब्यूशन व्हायला 10 वाजत असे साडे नवू दहा वाजता मी झोपेतुन उठुन मग मी बेकरित बसत असे. 
मग महेश घरी जावून आंघोळ वैगेरे करून 11:30 पर्यंन्त परत येत असे मग मी माझ आवरुन कॉलेज सुटायला कॉलेजवर जावून हाजरी लावून परत येत असे. 
मग दिवसभर बेकरीत टवाळकी करत tv बघत बसायच. थोडक्यात बेकरी म्हणजे आमचा अड्डा होता.
संध्याकाळी 9 वाजता बेकरी बंद करून नवीन पदार्थ खण्यासाठी जाणे हा जणू नियमच होता त्यावेळी देखील पि्झा,बर्गर,मसाला हार्ट्स, क्रोझोंन,मोमोज यासारखे पदार्थ आम्ही खात असु.
रविवारी बेकरी बंद असे त्यामुळे दर रविवारी नरसिंहवाडी, कोल्हापर रंकाळा,पन्हाळा श्रावणात रामलिंग अशां छोट्या ट्रिप होत अस कधी कधी मी त्याला गाडीवरून श्री क्षेत्र गोंदवले पण घेवून जात असे अस सगळ मस्त चालल होत. 
आणि एक दिवस अचानक महेश ने पहाटे 4:30वाजता फोन केला त्यावेली माझ्याकडे Nokia 3310 हा मोबाइल होता मी झोपेतच फोन उचलला तिकड़ून महेश घाबऱ्यां आवाजात म्हणाला लगेच खाली ये! 
मी म्हणालो अरे काय झाल तो म्हणाला तू आधी आहेस तसा खाली दुकानंच्या दारात ये !
मला वाटल गाडी वाल्याबरोबर कींवा गिराइका बरोबर भांडण झाल की काय म्हणुन मी लगेच खाली पळालो तर महेश आणि दूध टेंपो वाला दुकानाच्या दारात स्तब्ध उभारले होते मी काहीही विचारणार त्याआधिच महेशने बोटाने इशारा करून बेकरीचे शटर दाखवले. तिकडे पाहिल असता शटरच्या बरोबर मध्यभागी ऐका लहान पत्रावळीत गुलाबी भात त्यावर काळे तीळ,चिरलेला लिंबू आणि ऐका काठिला कापड गुंडाळुन ती काठी त्या भातात खोवली होती आणि गुंडाळलेले कापड पेटवल्या सारख वाटत होत.तसेच शटरच्या दोन्ही कुलपावर हळद कुंकुची बोट लावली होती. तो सगळा प्रकार माझ्यासाठी देखील नवीनचं होता पण वेळेच भान राखूंन मी महेशला "मुद्दाम कुणीतरी भीती दाखवायला केल असेल" अस म्हणालो मात्र महेश जाम घाबरला होता पहाटेच्या गार हवेत तो घमाघुम झाला होता. त्याची ती अवस्था बघून मला भयानक राग आला रागाच्या भरात ती पत्रावळ मी पायाने शेजारच्या गटारात उडवून दिली. बोरिंगच्या पाण्याची पाईप जोडून शटर समोरचा कट्टा आणि कुलुप वैगेरे सगळ पाणी मारून साफ केल तोपर्यंत महेश थोडा सावरला होता मग त्याने कुलुप उघडून अगरबत्तरी वैगेरे लावून बेकरी सुरु केली. 
महेशला धीर देवून माझ आवरण्या साठी मी घरी गेलो महेशचा 10 वाजता परत फोन आला मग मी खाली गेलो आणि महेश त्याच आवरण्या साठि स्कूटर घेवून घरी गेला 12 वाजत आले तरी महेश परत आला नाही म्हणुन मी त्याच्या घरी फोन केला असता त्याच्या आइने महेशची तब्बेत बरी नसल्यामुळे दवाखान्यात गेलाय म्हणुन सांगितले आमच बोलण चालूच होत तोपर्यंत महेश घरी आला आणि फोनवर म्हणाला थंडी वाजत होती म्हणून डॉक्टर कडे गेलो होतो थोड bp लो झालय पण ठीक आहे आज बेकरीत तूच बस आणि संध्याकाळी किल्या आणि कलेक्शन घेवून घरी ये !
मी बर म्हणालो आणि घरात सकाळचा प्रकार काही सांगू नको म्हणुन त्याला सांगितल. कारण घरातील लोक घाबरतील ते वेगळच शिवाय त्याच्या घरचे भावु,वडील वैगेरे बेकरीत येवू लागले तर आमचा अड्डा बंद होइल आसा स्वार्थी हेतुने घरात काही सांगू नको म्हणुन सांगितले. त्याने देखील होय म्हणुन संमती दिली. त्यादिवशी संध्याकाळी गल्ला आणि किल्या घेवून घरी गेलो सगळा हिशोभ त्याच्या ताब्यात दिला. आणि जेवून घरी आलो.
परत रेग्युलर रूटीन सुरु झाल होत मात्र महेशच देवधर्म थोड वाढल होत असेच दिवस, आठवडे, महीने जात होते आणि एक दिवस परत पहाटे धापा टाकत महेश घरी अाला मला शिव्या देत म्हणाला मोबाइल कुठे आहे ! मी म्हणालो आहे इथेच कुठेतरी तो म्हणाला मोबाइल लागत नव्हता तुझा म्हणुन दुकान उघड टाकून आलोय लवकरच खाली ये ! खर त्यावेली माझा मोबाइल बेड वरुन खाली पडूंन बंद पडला होता. मनात शंकेची पाल चूकचुकली म्हणुन मोबाइल घेवून मी पळतच खाली गेलो. महेशची बेकरी उघडलेली होती आणि महेश माझी वाट बघत बाहेरच उभा होता सगळ व्यवस्तिथ दिसत होत. मागच्या वेळी सारखा काही प्रकार दिसला नाही. 
म्हणुन मी विचारल आता काय नाटक आहे बाबा...!
तो म्हणाला आत जावून बघ मी त्रासिक पणे आत जाण्यासाठी काउंटर उघडले आणि आत पाय टाकला दूसरा पाय जमिनीवर काहीतरी लालसर चीकट लिक्विड सांडल होत त्यात गेला. मी थोड़ मागे सरकलो.
तो पर्यंत महेश माझ्या माग आत आला होता त्याच्या कडे बघून म्हणालो काय सांडून ठेवलय हे ! 
तो म्हणाला मी कशाला सांडतोय वर बघ ! 
मी डोक्यावर सीलिंग कड़े पाहिल आणि दचकलो! वर हुकाला पांढऱ्यां कापडात कहितरी बांधल होत आणि त्यातून तो चीकट स्त्राव पडत होता. 
मी म्हणालो हे आणि काय केलय?
तो म्हणाला अरे हा कोहाळु आहे उद्घाटन करताना बांधला होता जवळ जवळ 6 महिन्या पूर्वी आणि आता तो खराब होवून त्यातून हे पडतय ! 
मला हसाव की रडाव हेच कळत नव्हतं.मी म्हणालो बर मग...!
तो म्हणाला कुणीतरी माझ वाइट व्हाव म्हणुन करणी वैगेरे काहीतरी केलय म्हणून हे अस होतय !
मी म्हणालो अस करणी वैगेरे काहीही नसत शेवटी ते फळ आहे आज नाहीतर उदया खराब होणारच! 
पण तो ऐकायला तयारच नव्हता कस बस त्याला समजावून ते बांधलेल कोहाळु काढून फेकून दिला फ्लोअर स्वच्छ करून घेतली आणि घरी आलो सगळ आवरून इछा नसताना पुन्हा बेकरीत गेलो मला बघून महेश आवरून येतो म्हणुन घरी गेला. दुपारी त्याचा फोन आला बेकरी बंद करून सगळे पैसे आणि तूझे कपडे वैगेरे घेवून तयार रहा आपण दोन दिवसां साठी बाहेर जातोय च्यायला हे येड बीड झालाय की क़ाय म्हणुन त्रासिक पणे घरात गेलो माझ सगळ आवरून कपडयाची बैग घेवून खाली येवून थांबलो 10 मिनिटात महेश आला त्रासिक आणी चिडूंन त्याला म्हणालो अरे कुठ जातोय आपण तो म्हणाला गावाबाहेर गेल्यावर सांगतो! त्याच्या स्कूटरवर गप्प बसलो त्याने गाड़ी st stand वर नेवुन पे एंड पार्क मधे लावली आणि बस बघु लागला आता माझी सहन शक्ति संपत आली होती पण मी गप्प राहिलो काही वेळाने कर्नाटक बस मधे चढू लागला त्याच्या मागे मी देखील गुपचुप चढलो आणि त्याला मागे ओढून खिड़की कड़ेला बसलो. महेश माझ्याकडे बघून हसला आणि गप्प बसला .
त्यावेली वॉकमन नावाच ऑडियो कैसेट मधील गाणी एकण्याच उपकरण प्रसिद्ध होत. माझ्याकडे पण वॉकमन होता तो काढून रोजा पिक्चर मधील गाणी ऐकु लागलो तेव्हडयात गाड़ी सुरु झाली होती स्टैंडच्या बाहेरु आली होती कंडेक्टर जवळ आला महेशने हुबळीच्या पुढे असणाऱ्या गावाची दोन तिकीट काढली मी दुर्लक्ष करून गप्प बसलो होतो गाड़ीने इचलकरंजी सोडली आणि महेश बोलू लागला आपण हुबळी येथे सिद्धारूढ़ स्वामींच्या मठात जातोय ! 
तिथ तेथील स्थानिक महाराज आहेत ते भेटणार आहेत मला या बाबतीत इचलकरंजीत कुणाला काही सांगू नको म्हणुन सांगितले होते म्हणुन तुला बोललो नाही अस म्हणुन माफी मागून तो गप्प झाला.आता माझा राग कमी झाला होता मी रिलेक्स झालो घरी फोन करून सांगितले की गोंदवल्याला चाललोय 2 दिवसांनी परत येतोय अस खोटच सांगितल...
आई म्हणाली आमवस्या आहे आणि आता कशाला बाहेर जाताय मी म्हणालो देवाला चाललोय काही होत नाही या सगळ्यांत संध्याकाळचे पाच वाजले होते गाड़ी एका ठिकाणी 10 वाजता जेवणासाठि थांबली आम्ही तिथे जेवलो आणि थोडा वेळ बाहेर थांबुन गाडित येवून बसलो गाडित 7 8च पैसेंजर होते थोडा वेळ बोलूंन आम्ही झोपलो किती वेळ गेला माहित नाही पण काही बोलण्याच्या गलबल्या मुळे मला जाग आली गाड़ी थांबलेलीच होती. मी घड्याळात पाहिले 12:15 झाले होते आमवस्या असल्यामुळे पूर्ण अंधार होता. मी महेशला उठवले तो म्हणाला आल का हुबळी मी म्हणालो चल उतरून बघु म्हणुन आम्ही बस मधून उतरलो तर बस मघाशी जेवलो त्याच धाब्यावर होती आणि बसच्या ऐका साइडला बस मधील 7 8 पैसेंजर बोलत थांबले होते.
मला जाग आणनारा आवाज त्यांचाच होता !
महेशने विचारल काय झाल गाड़ी अजुन इथेच कशी म्हणुन. त्यावर ऐका पैसेंजर ने सांगितल की जेवत असताना ड्राइवरला फोन आला की त्याची आई एक्सपायर झाली आहे म्हणुन तो निघुन गेला आहे आणि त्याच्या बदली दुसरा ड्राइवर येत आहे अर्ध्या तासात पण 12:30वाजत आले तरी ड्राइवर आला नाही आशी सगळी माहिती त्या पैसेंजरने दिली.
पहाटे लवकर हुबळीत पोहचुन त्या महाराजांना भेटणे महेशसाठी महत्वाच होत त्यामुळे तो अस्वस्थ होत होता आणि तेव्हड़यात M80गाडी वरुन दोन व्यक्ति आल्या त्यात एक ड्राईवर होता तो म्हणाला गाड़ी वाटेत बंद पडल्या मुळे वेळ झाला !
त्याला आसुदे म्हणुन आता वेळ नघालवता निघण्याची विनंती केली. आणि गाड़ी लगेच सुरु झाली खिडकीतून बाहेरच काहीच दिसत नव्हतं म्हणुन आम्ही सारख कंडेक्टरला हुबळी आल की सांगा म्हणुन सांगत होतो गाड़ी परत एक दोन वेळा थांबली आणि गाडितले 5 6 पैसेंजर उतरून गेले आता गाडित आम्ही 4च जण होतो ड्राईवर,कंडेक्टर, महेश आणि मी आता पुढचा स्टॉप हुबळी आहे अस कंडेक्टरने सांगितले तस आम्ही आमची बैग वैगेरे घेवून तयारित होतो रात्रीचे 3 वाजले होते आणि अर्ध्या तासाने गाड़ी थांबली आम्ही खाली उतरलो हवेत गारवा असल्यामुळे आम्ही आमच्या शाल पांघरुन घेतली. महेश आधी दोन वेळा सिद्धारूढ स्वामी मठात येवून गेला होता कारण महेशने कलावती माता अनुग्रह घेतला होता आणि सिद्धारूढ स्वामी कलावती आईचे गुरु होते.
आम्ही त्या आमावसेच्या काळोखात रसत्याचा आंदाज घेत होतो. महेश म्हणाला आता यावेळी आपल्याला रिक्षा वैगेरे काही मिळणार नाही थोड़ आड़ वाटेंन चालत गेल्यास दीड एक किलोमीटर चालत गेल्यास आपण पावुण तासात मठात पोहचु.
मी पण ठीक आहे म्हणुन तयार झालो कारण त्यावेळी कर्नाटकात रात्री12 नंतर कुणी फिरताना दिसला की कर्नाटक पोलिस ताब्यात घेत आणि सकाळी चौकशी करून मग सोडत.
पोलिसांनी पकडण्यापेक्षा चालत गेलेल बर म्हणुन चालत जायला तयार झालो. 

थोडी झाड़ी आणि दोन्ही साइडला काही साधी मातीची घर असणारी भरपूर खड्डे युक्त पायवाट होती अंधार असल्यामुळे अडखळत शांत पणे आम्ही चाललो होतो नीरव शांततेत फक्त आमचे श्वासोच्छवास आणि पायांचा आवाज येत होता असच थोड चालल्या नंतर घर संपली आणि नीलगिरी सदृश्य झाडे सुरु झाली चालता चालता माझ सहज लक्ष गेल माझ्या उजव्या साइडला गेल तिकडे मुस्लिम स्मशान भूमी होती. गार वार आणि हलकासा धुर कींवा धुक्यानी वातावरण भरले होते आणि अचानक आमच्या पासून 40 एक फुटावर ऐका कबरीच्या सीमेंटच्या कट्यावर हालचाल झाली आणि एक पाढरी आकृति उठुन उभी राहिली मी तिकडे पाहुन महेश कड़े पाहिल तर तो देखील आ वासुन तेच पहात होता महेशचा चेहरा पांढरा फट्ट पडला होता डोळे मोठे झाले होते मी महेशचा हाता घट्ट पकडला आणि म्हणालो महेश थांबू नको आणि पळू देखील नको रामनाम घेत सरळ चालत जावू अस म्हणुन परत आम्ही चालू लागलो महेश खाली मान घालुन चालत होता मी मात्र त्या आकृतिवर नजर ठेवून सावध पणे चालत होतो.आता ती आकृति तिथुन उठली होती आणि आमच्या दिशेने कुणीतरी ढकलत आसल्या प्रमाणे हेलकावेखात येत होती संपूर्ण पांढरी आकृति आता आमच्या मागे 20 फुटावर होती आम्ही थोड्या गतिने चालत होतो आणि अचानक ती आकृति जवळ आली जवळ जवळ 10 फुट आणि मी नीट पाहिल पांढरा विजार शर्ट घातलेला 6फुटापेक्षा ऊंच माणूस होता.त्याचा चेहरा दिसत नव्हता मात्र तो झपाट्याने चालत होता आता तो आगदी आमच्या मागून चालत होता आणि अचानक त्याच्या तोंडातुन विचित्र आवाज यायला लागला तो ओरडत होता या गड़बडित महेशचा पाय रस्त्यावर झोपलेल्या कुत्र्याच्या आंगावर पडला त्या मुळे महेश पण अडखळुन पडत होता पण मी हात घट्ट धरला असल्यामुळे त्याला सावरले इकडे त्या कुत्र्याच्या भूंकण्या मुळे आणखी 4 5 कुत्री भूंकत आमच्या दिशेने येवू लागली. मी महेशला सांगत होतो महेश पळायच नाही म्हणुन पठीमागे गोंगाट वाढत होता ओरडण्याचा भूंकण्याचा आम्ही झप झप चालत होतो आणि दूरवरुन "ॐ नमः शिवाय" चा आवाज ऐकु येवू लागला आता मागची व्यक्ति झाडीत निघुन गेली कुत्री सुद्धा मागच्या मागे पसार झाली आम्ही मठाच्या जस जसे जवळ जात होतो "ॐ नमः शिवाय" चा आवाज तीव्र होत होता आणि आमच्या मनावरचे दडपण कमी कमी होत होते पहाटे 5 वाजता आम्ही मठाच्या आंगणात होतो मठात आम्हाला रूम मिळाली आम्ही रूमवर झोपलो 6-7 च्या दरम्यान महेश म्हणाला मी महाराजांना भेटून येतो तू झोप मी माननेच होकार दर्शवुन परत झोपी गेलो काही वेळाने झोपुन उठालो 9 वैगेरे वाजले होते महेश अजुन आला नव्हता. मी मस्त गरम पाण्याने आंघोळ आवरून घेतली कपड़े वैगेरे करून फ्रेश झालो मठात जावून स्वामींच्या पुढे नतमस्तक झालो आणि प्राथना केली 
🚩 जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय 🙏
तेव्हडयात महेश मठात आला तो खुशित आणि फ्रेश दिसत होता.
मी विचारल झाल काम त्यांन हो...! एव्हड़च उत्तर दिल मी पुढे काही विचारल नाही त्याने देखील काही सांगिलतल नाही... 
आम्ही मस्त पैकी ऐका होटल मधे नाश्ता केला दुपारी मठात प्रसाद घेतला आणि परत फिरलो अंनगोळ येथे कलावती माता मंदिरात दर्शन घेवून राजपुरोहित होटल मधे मुक्काम केला राजपुरोहित येथे राइस प्लेट प्रसिद्ध आहे गोड आणि भाज्या अशां 20वाट्या ताटात असतात मस्त जेवण करून झोपलो सकाळी लवकर बाहेर पडूंन इचलकरंजीची गाड़ी पकडली दुपारी इचलकरंजीत टच परत रेग्युलर रूटीन सुरु झाल 5वर्ष बेकरी आणि आमची मैत्री व्यवस्तिथ जोमात सुरु होती नंतर मी नोकरीच्या निमत्ताने मी पुण्याची वाट धरली.
महेशने पण वेगवेगळ्या एजन्सीज घेवून व्यवसाय वाढवला आता बेकरीचा वापर गोडावुन म्हणुन आहे आधेमधे भेट झाली की आम्ही आठवण काढून बोलत बसतो पण हुबळी मधे महाराजां बरोबर काय बोलण झाल ते मी विचारत नाही आणि तो सांगत नाही...🙏
(सिद्धारूढ स्वामी मठामधे 24×7 "ॐ नमः शिवाय" ची टेप चालू असते त्याचा आवाज रात्री 1 ते दीड किलोमीटर पर्यंत येतो)
© अनूप श्रीकांत हल्याळकर, इचलकरंजी🙏
Image may contain: sky and night

आईची माया.....

दिपिका आस्वार.....

आईची माया.....


मी तुम्हांला आता जे काही सांगणार आहे,, ती दहा दिवसांपूर्वी माझ्यासोबत घडलेली खरी गोष्ट आहे... ही भुताची गोष्ट तर नाहीच पण मला पडलेलं स्वप्न किंवा भास असेल असे तुम्हांला वाटेल पण हे ही खरं नाही कारण मी ही गोष्ट घडताना प्रत्यक्षात पाहिली आहे...

Image may contain: 1 person, text
माझे आई- नाना (बाबा) आणि मोठी बहीण काही कारणा निमित्त पुण्याला गेले होते... मी माझ्या दोन लहान बहिणी आणि भावा सोबत घरीच होते (बदलापूरला).... आई नानांना जाऊन दोन दिवस झाले असतील तेच माझी लहान बहीण निलम आजारी पडली... तिला सांभाळायला मी होतेच पण आई ती आईच असते ना... आई कधी येणार अस ती सारख विचारत होती... आई सोबत कॉल वर बोलूनही तीच मन भरत नव्हतं... संध्याकाळी आईला कॉल केला तेव्हा ती म्हणाली आम्ही उद्या नक्की येऊ... मला बर वाटलं आणि तिलाही आनंद झाला... आईचा जीव तर इथेही अडकलेला पण पुण्यालाही तितकंच महत्वाच काम होतं.... त्याच रात्री पावणे तीन ते तीनच्या दरम्यान लाईट गेली... तशी मी जागी झाले.. मोबाईलच टॉर्च लावणार तेच माझी नजर दाराकडे गेली आणि बघते तर काय,, आई दरवाज्याच्या इथून निलमकडे आली... मी तिला बघतच बसले.. इतक्या रात्री आई इथे कशी?? मी अंधारातही आईला बघत होते... आई तू इथे आणि ते पण इतक्या रात्री?? कधी आलीस... मी आईला विचारत होते पण तीच लक्ष माझ्याकडे नसून निलमकडे होतं... ती मला आणि माझ्या लहान भाच्याला ओलांडून निलमकडे गेली... पण मी काय बोलत होते,, हे ती ऐकतच नव्हती... ती निलम जवळ गेली आणि तिने तिच्या डोक्यावरून हात फिरवला... मी आईलाच बघत होते तेच मोहितने म्हणजे माझ्या लहान भावाने मला आवाज दिला.... दिपाताई,,, टॉर्च लाव ना.... मी त्याच्याकडे बघतच म्हणाले हा लावते... पुन्हा आईकडे पाहिलं तर आई दिसलीच नाही आणि थोड्या वेळातच लाईट आली... मला वाटलं मला भास झाला असेल पण नाही मी खरंच आईला पाहिलं होतं... मला निखिलने (भाचा) विचारले,, तू काय बडबडतेस आत्या?? आई तर इथे आल्या नाहीत,, तुला कुठं दिसल्या?? तोच प्रश्न निलमने पण विचारला... मोहित पण बघायला लागला... ते तिघ घाबरतील म्हणून मी शांत बसले... पण मनात एकच प्रश्न... ह्यांना का नाही दिसली आई?? तो विचार करता करता मी केव्हा झोपले समजलंच नाही...

मला माहित आहे,, तुम्हाला माझ्या बोलण्यावर विश्वास बसणार नाही पण हे सगळं खरं आहे... आई घरी आल्यावर मी ही गोष्ट आईला पण सांगितली तेव्हा ती म्हणाली,,, आईच काळीज असच असतं... मी निलमचीच काळजी करत होते,, त्या रात्री मला पण झोप लागली नाही... म्हणजे आई त्यावेळेस जागी होती ,, मग मला दिसलेली व्यक्ती कोण असेल???

आईच होती का ती,, म्हणून तर मी घाबरले नसेल...

आयुष्यभरासाठी पडलेला प्रश्न...
Image may contain: 1 person, text

शुक्रवार, 30 नवंबर 2018

फार्म हाउस भाग -२


 

फार्म हाउस भाग -

Image may contain: outdoor

"खुप विराण जागी ते मंदिर होते. सरवजण तिथे जायचा विचार करु लागले. "चला मग बघुया कोणत मंदिर आहे या निर्मनुष्य जागी ??? सरव जण निघाले अनिल पुढे होता. अनिल त्या मंदिराच्या समोर आला सर्वानी आपापले शुज काडले आणि त्या मंदिरात देव दर्शन घेतले ती देवता नक्की कोणती होती काहिच कळत नव्हते भग्न मंदिरातही कोणितरी फुल चढवली होती. वाळलेली फुल जयेश ने काढुन टाकली ....अनिल आणी सौरभ ने मुर्तीला साफ केले जवळच काही रान फुलांची झाड होती... अनिल ने ति फुल तोडली आणी देवाला वाहिली विक्रांत नेहि त्या देवासामोर हात जोडले सरवानी आप आपले डोळे मिटले . इतक्यात तिथे थाडकन काहि पडल्याचा आवाज आला तस सरवानी डोळे उघडले बघतातर काय एक कलश जमिनिवर पडला होता !!!!

अनिल ला देवाची मर्जी कळली त्याने तो कलक्ष हातात घेतला मंदिरा बाहेर आला दुर वर नजर फिरवली लांब लांब वर एक नदि दिसली !!
अनिल ने सौरभ ला सांगितल की आता आम्ही जाउन त्या नदिच पाणी घेउन येतो तु आणी विक्रांत ईथेच थांबा !!! अनिल जयेश निघाले वाटेत खुप झाडे झुडपे काटे होते मार्ग कठिण होता पण वाट काडत ते नदिवर पोचले तो कलश नदिच्या पाण्यात बुडवला. ति जागा निर्मनुष्य होती रान किड्यांचा आवाज घुमत होता मधेच एखादा पक्षी आरोळी ठोकत होता... अनिल जयेश ला ति नदि खुप आवडली फार स्वच्छ नितळ पाणी शांत वातावरण दोघानाहि तिथुन हलायचे मन करत नव्हत. दोघानिहि नदित उतरुन गार पाण्याने हात पाय तोंड धुतले आणि परत मंदिराच्या दिशेेने निघाले .
मंदिरात सौरभ आणी विक्रांत वाट पाहत होते मंदिरात पोचल्यावर अनिलने त्या मुर्तीचे पाय पाण्याने धुतले आनी तो कलश देवासमोर ठेवुन नमस्कार केला मग अनिल ने सरवांना नदि बद्दल सांगितल आणी नदिकडे सरवांनी प्रस्थान केल काहि अंतरावर येताच अनिल च्या मनात काहि आले त्याने लागलीच परत मंदिरा कडे धाव घेतली सरव जण त्याला हाका मारत होते पन हा असा अचानक धाउन गेला सरव जण गोंधळले काहि करावे सुचेना शेवटी बाट बघण्या ऐवजि कोणताच परयाय नव्हता थोड्याच वेळात तो परत आला
काय झाल
काहि नाही माझी वस्तु राहिली होति घेउन आलो चला नदिवर!!!!
चारि मित्र नदिवर आले ति नदि पाहुन खुप आनंद झाला आजु बाजुला कोणि नव्हत निर्मनुष्य जागा
सरवानी आपापले कपडे काडले आणी नदित उड्या टाकल्या आणी नदिच्या थंड पाण्याचा मनसोक्त आस्वाद घेतला सरव जण खुप खुश होते. पाण्यात दंगा मस्ती चालु होति खुप गोंधळ होता.
पाण्यातुन बाहेर आल्यावर सरव जण गाडीत बसले दंगा मस्ती करत सरव गाणी म्हणत मजेत जात होते . मन फ्रेंश झाल पण जस जस फार्म हाउस जवळ आल तस तस सरव जणांचा मुड चेंज होउ लागला... फार्म हाउच वर पोचयला संध्याकाळ झाली दिवस मावळला सरव जण फार्महाउस वर उतरले सामान खाली केल... अजुन प्रकाश होता सरव जण हॉल मधे आले आणी सोफ्या चेयर्स वर रिलेक्स झाले !!!!
बोलता बोलता विषय निघाला कि आज खुप मजा आली पन आता रात्रीच काय ????
मि ठरवलय कि काहि झाल तरी याचा शोध घेणार विक्रांत बोलला
अनिल म्हणाला "विकी तु जरा शांत हो कदाचीत जर हे खर असेल तर उगाच आपल्याला त्रास नको त्या पेक्षा आपण ईथुन सेफली निघु काहि दिवसात
पन विकि अर्थात विक्रांत एकणार थोडी होता त्याने मनाशी पक्क ठरवल होत काहि झाल तरि या जागेच रहस्य जाणुन घ्यायच काहि वेळातच सदा भाऊ तिथे आले त्यानी सरवाना चाहा नाश्ता करुन दिला आणि जेवायचा तयारिला लागले विकि त्यांच्या कडे संक्षयाने पहात होता कदाचित आम्हाला घाबरुन पळवण्याचा याचा डाव असेल जेणे करुन याला ईथे रहाता याव बघेनच आज याला मनात विकि पुटपुटला ईथे अनिल आणि सौरभ एकत्र आले त्यांनिहि ठरवल कि आज रात्री झोपायच नाहि या गोष्टिची शहानिशा करायची ... रात्र होत आली वाजले सदा भाउंनि जेवण रेडि केल आणि ते हॉल मधे आले "बाळांनो जेउन घ्या मग मि हि जायला मोकळा आणि आज रात्री घराचे सरव दरवाजे खिडक्या बंद करा आनी कोणि रात्री आल तरी उघडु नका ईथे सहसा कोणिच येत नाहि मला फोन करा रेंज असेल तर
काळजि घ्या.... जेवण झाली तस सरव काम आटपुन सदा भाउ निघाले चला मि निघतो आणि ते बाहेर पडले ईथे विकी चि नजर त्यांच्या वर होती .... सदा भाउ जसे निघाले तसे विकिहि बाहेर पडला "मि आलोच जरा जरुरिच काम आहे अस म्हणत तो भाउंच्या मागे गेला
सरवांना वाटल की काकांना काही विचारत असावा म्हणुन कोनी काहिच बोलले नाहि तसा विकी जरा अंतरावरच होता सदा भाउ गेट वर जाताच विकिने मागुन जाउन चाकुच्या धाकाने सदा भाउंना अडवले "थांबा
s ss मि काय केलय ????
"
काहि नाहि पण मला बघायच आहे आज रात्री काय होतय ते तुम्ही चला माझ्या बरोबर ... विकि ने फार्म हाउस च्या मागे एक अडगळीची रुम होती त्यात त्याना नेल आणि चाकुच्या धाकाने तिथल्या खुर्ची वर बसवल त्यांना त्या खोलीत डांबुन तो बाहेर पडला ईतरत्र शोधुन तो रशी घेउन आला आनी परत त्या रुम वर जाउन त्याना त्या खुर्चीला बांघले आणि दमदाटी केली !!!!
"
बाळा मि काय केलय का मला बांधतोयस?!!!! का माझ्या जिवावर उठलास !!! मि गरिब माणुस कोणाच काय बिघडवणार आहे???
गप बसा "तुम्हाला मि काहि करणार नाहि फक्त आजचि रात्र तुम्हाला या खोलीत रहाव लागेल
"
मला माफ कर मि काहि केलेल नाही बाळा माझ एैक हि जागा चांगली नाहि ईथे या आत्मा्ंच्या सोबत मि हि रात्र तरी काडेन का माझ पण घर परिवार आहे दया कर !!!
"
भुत बित काय नसत काका मला तुमच्यावरच डाउट आहे जरा आजची रात्र जाउदे मग ठरवेन मि तुच काय करायच ते विकिने एक दिवा त्या खोलित पेटत ठेवला आणी एक रुमाल त्यांच्या तोंडावर बांधला आणी विकि परतला ....! सरव जण विचारत होत अरे कुठे होतास ???
"
काहि नाहि ते जरा भाउंशी जरा खाजगि बोलायच होत तुम्हाला माहित आहेना माजा बरोबर काय झाल त्या संधर्भात ...
चला ठिक आहे आज आपण खुप थकलोय आज लवकर झोपु उद्या नविन अेडवे्ंचर साठी जाऊ मि ईथे अजुन काहि जागा सर्च केल्यात जिथे आपण ईंज्योय करु
अोके म्हनुन दोघा दोघ मित्र दरवाजे खिडक्या लावुन झोपायला गेले !!!!
रात्र झाली इथे सदा भाउंचे तोंड पण बाघुन ठेवले होते त्याना खुप धडकी भरली कारण त्या खोलीत सुद्धा ते एकटे नव्हते काही तरी कोणि तरी अनोळखी सोबत रात्री त्यांना होणार होती ... सदा भाउ आजु बाजुला बघत होते पण त्याना काहिच करता येत नव्हते मनातल्या मनात ते देवाच्या धावा करत होते त्या्चा जवळच एक दिवा पेटत ठेवला होता त्या प्रकाशाचा त्याना धिर होता!!!
ईथे रात्री सरव जण झोपेचे सोंग घेउन होते ....गेम तर आता सुरु होणार होता.... रात्री सरव मित्रानी प्लान बनवला होता पण कोणलाच खबर नव्हती ....ना या काना चि त्या कानाला !!!! अनिल आणि सौरभ दोघांनिहि रात्री फार्म हाउस च्या आजुबाजुला शोध घ्यायचा ठरवले आणी या भुतांचा तपास करायचा ठरवला !!!
ईथे विकी आणी जयेश ने रात्री बाहेर पडायच ठरवल पण बाकिच्या दोघांना हे ठाउक नव्हत !! रात्रिचे तिन वाजले जयेश आणी विकी बॅटरी चाकु माचिस घेउन बाहेर पडले ईथे अनिल आणी सौरभ चा रुम बंद असल्याची खात्री केली आणी ते बाहेर पडले बैटरीच्या प्रकाशात आजु बाजुच्या झाडी झुडपात शोधु लागले काही अंतरावर त्याना लाहान मुलांच्या रडण्याचा आवाज येउ लागला !!!
तस दोघे सावध झाले . आवाज कुठुन येतो ते काहिच कळत नव्हत . जयेश घाबरला पण विकी घाबरला नाहि त्याला आजुनही हे पटत नव्हत !!!
ईतक्यात एक कानथळ्या बसवणारी भयाण किंकाळी ऐकु आली !!!
दोघ ही "कोण आहे ssss कोण ssss करत घाबर घुबरे होउन अोरडु लागले ईतक्यात एक जोराच वायुचा झोत आला आणी विक्रांतला जणु फेकुनच दिल विक्रांत जबरदस्त धक्का लागुन जमिनिवर कोसळला !!! हे अनपेक्षीत होत विक्रांत च्या हातातला टोर्च पडला जयेश ने त्याला सावरल आनी ति जागा सोडायला भाग पाडल दोघही पळाले अाणी एका अडोशाला जाउन लपले....पण तिथेही त्यांना चैन नव्हती तिथल्या अतृप्त आत्माना त्यांच तिथे असण मान्य नव्हत !!! झाडावरुन एक लहान दगड जयेश च्या डोक्यावर पडला कोण आहे बोलत दोघानिही टोर्च आंधारात झाडाच्या फा्ंद्यावर केला फांद्या्वर एक सफेद शुभ्र आकृती होती ... ति एक बाई होती तिला पाहुन दोघांची बोबडिच वळली दोघ जिव मुठित घेउन पळत सुटले .आणी एका सुरक्षीत जागी आले
विकी ज्याचा या गोष्टिवर विश्वास नव्हता तो जयेश ला धापा टाकत विचार होता "काय होत ते बापरे हे अस असु शकत का !!!!!!
"
माझा विश्वासच बसत नाहि!!!!
"
मि तुला आधिच सांगितल होत काहितरी नक्किच आहे ईथे ..तुला कुठचा विश्वास माझ्या बोलण्यावर ???
ईथे अनिल आणी सौरभ पण तयार झाले ते देखिल निघाले तयारित !!!
फार्म हाउसच्या आवारातल्या जवळ पास अर्धा अधिक लाईट्स बंदच होत्या अर्धवट प्रकाशात चांदण्याच्या सोबतिने अनिल निघाला त्याच्या हातात बैटरी एक पाण्याची बोटल होती सौरभ ने विचारल हे काय आहे???
"
वेळ आल्यावर सांगेन तु चल आधी ...दोघा्नी विकीचि रुम बंध पाहुन जपुन दरवाजा उघडला पन त्याना माहित नव्हत की बाहर आधिपासुनच ते शोधा शोध करतायत !!! ईथे फार्म हाउच्या मागच्या बाजुला विकी आणी जयेश होते अनिल आणि सौरभ ने पुढुन सुरवात केली घराच्या बाहेर पडतातच त्याना ही लहान मुलांच्या किंकाळ्याचा आला आपल्या सोबत अजुन कोणी तरी आहे याची जाणिव होउ लागली ते जंगलात झुडपात बॅटरी मारतच होते अचानक अवाजाने दचकत पण होते त्याना एकमेकांचा धिर होता !!!
ईथे विकि ला आठवल कि त्यानी सदा भाउना बंद करुन ठेवल आहे नक्किच ते यात सामिल नसावेत बघु तरी म्हणुन विकिने जयेश ला सांगिल जयेश ने विकिच्या बोलण्यावर राग केला तु त्या गरिब सज्जन मानसाला डा्ंबुन ठेवलस ???? काय माणुस आहेस यार ???
अस नाहिरे मला डाउट क्लियर करायचा होता .तरी पण झाल ते झाल चल बघु म्हणत ते निघतच होते ईतक्यात "कोणी तरी येतय कोणितरी येतय भुत भुत बोलत जयेश घाबरत बोंबलला अरे पळ पळ .. काय झाल विकि ने विचारल तसे त्यानि समोर पाहिले कोणि तरी त्या्चाच दिशेने येत होते पण जाना त्यांनी बघितल होत ते तर सौरभ आणि अनिल होते !!! त्याना देखिल यांवी हालचाल जाणवल्याने ते देखिल घावु लागले विरुद्ध दिशेने चारि जण घाबरले होते !!! घरा समोर गोल गोल धावत होते जिव घेउन आरडा अोरड करत तेवढ्यात मधेच अचानक एका झाडा खाली आगडोंब उसळला सरवच थबकले !! ति आग अजुनही धगधगत होती सरवांच लक्ष त्या कडे वेधल पण विकी जयेश चि हिम्मत नव्हती ते बघायची पन अनिल आणि सौरभ आगी जवळ गेले !!! ईथे लांबुन त्या प्रकाशात त्याना अनिल सौरभ दिसले अरे हे तर अनिल सौरभ हे काय करतायत ईथे ??? चल आपण पण जाउ !!त्याना धिर आला तसा ते घावत आगिच्या दिधेने आले आरडा अोरड करत !!! अस अचानक त्या्च्या येण्याने अनिल सौरभ घाबरले ते पळणारच होते ईतक्यात थांबा थांबा मि विकि आहे आम्हीपण तेच शोधतोय जे तुम्ही शोधतायत धापा टाकत विकी बोलत होता !!!!
तुम्ही कधी आलत ते पण आम्हाला सांगता
"
चिल रिलेक्स हो ते आपन नंतर बोलु आता मिळुन शोधु "ते शोध बिध राहुद्यात चला ईथुन आत तिथे आपण सिक्योर राहु ते जरा हि विलंब लावता धावत होते ईतकयात विकि थांबला अरे सदा भाउ त्यांचा हि जिव धोक्यात आहे काय करुया ????
विकिने सरवांना भांउं बद्दल सांगितल ते त्याच्या या वागण्यावर चिडले
तु माणसात आहेस का नकोते करतोस ??? आता सरवांचे्च जिव घोक्यात आहेत !!!
काय कराव हे कोणालाच सुचत नव्हत ... जाव की नाही हा विचार करत ते मागे फिरतच होते कि ईतक्यात ति पांढरी आकृती परत दिसली ... तिच्या बरोबर लाहान मुले हि होती हे दृश बघताच सरवांच्या काळजाचा थरकापच उडाला आणी ते जिव घेउन घावत पऴत फार्म हाउस च्या दिशेने धावले.... फार्म हाउस जवळ पोचताच दरवाजा ऊघडण्याचा प्रयत्न सरव करु लागले पण काहि केल्या दरवाजा उघडत नव्हता... ति भुत आपल्या मागावर आहेत या भितिने ते सरव जण दरवाजावर जोर जोरात हात पाय मारत होते तेवड्यात अनिल ला काहि आठवले त्याने त्याच्या हातातिल पाण्याच्या बॉटल मधुन पाणी काडुन ते दरवाजा वर शिंपडले तसा तो ताडकन उघाडला... जोरात किंकाळी एकु आली.... तसे सरव जण अात शिरले आणि दरवाजा लाउन घेतला... पन दरवाजा परत जोर जोरात कोणी तरी परत ठोकत होत त्या आवाजाने सरवांच्या काळजाचा ठोका चुकत होता.... मोठ मोठ्या किंकाळ्यानि ते फार्म हाउस दहशतिने भरल... विकी च्या डोक्यावर या सरवाचा परिणाम झाला होता तो जरा विचित्राच वागु लागला त्याने हावभाव बदलले तस तो धावतच दरवाजा जवळ गेला आणी त्याने दार उघडल आणी क्षणार्धात बाहेर पळुन गेला....
सरव जण हा प्रसंग पाहुन बिथरले आता याच काय होणार या काळजीने सरवांचे जिव भांड्यात पडले ...
आता तर आजुनच पेच प्रसंग निर्माण झाला ...अनिल ने पुढे जाउन तो दरवाजा तत्काळ बंद केला बाहेर डोकाउ बघण्याच धाडस त्याला झाल नाहि जरि त्याचा तो जिवलग मित्र होता .... ईतक्यात एक दगड खिडकिवर आदळला आणि काच फुटल्याचा आवाज आला यातुन सारवतो ना सावरतो तोच घराच्या आतुन आवाज येउ लागले काहिच कळत नव्हत कि नक्कीसौरभ विक्रांत जयेश अनिल हे चार लंगोटी यार खुप वर्षांनी एकत्र भेटणार होते .. लहान पणा पासुन एकत्र वाढलेले दंगा मस्ती मधे जिवन जगलेले आंनदाने नाव्हुन गेलेले हे यार आता आपापल्या आयुष्यातील वेळ काढुन खास भेटणार होते. दिवस ठरला वेळ ठरली जागा निवडली ... अनिलच फार्म हाउस ....
शहरा पासुन दुर एकांतात वसलेल अनिलच्या वडलानी खुप वर्षा अगोदर विकत घेतलेल पण तिथे कोणिच जात नसायच वर्षानु वर्ष बंद पडलेल हे फार्म हाउस नुकताच अनिलच्या वडलानी नुकतच साफ सफाई करुन चालु करुन घेतल होत ...
तिथे काम करणार्या मजुरांच म्हणन होत की ते फार्म हाऊस झापाटलेल आहे ... त्यांना हि काम करत असताना खुप भयानक आणी अविश्वसनिय अनुभव आले होते दिवसा तर ठिक पण रात्री या फार्म हाउस मधुन चित्र विचित्र आवाज ऐकु येत असत असा रहिवाशांचा अनुभव होता ..
हे फार्म हाउस वापरात काढायच्या उद्देशाने अनिलच्या वडलानी ते अनिल ला दिल .. अनिलचे वडिल बिजनेस मेन असल्याने या सर्व वावड्या असल्याच त्यांच म्हनण होते हि जागा बळकवण्या साठि ठेकेदारांचा डाव असावा असा त्यांचा विश्वास होता असो ...
सुट्टी सेलिब्रेशन फार्म हाउस वर मोठ्या जल्लोशात साजर करायच अस ठरल होत दिवाळीची सुट्टी इंन्जोय करायला मुल सज्ज झाली आणि तो दिवस उजाडला .
"
सरवानी माझ्या घरी ठिक ५वाजता जमायच आहे आपण माझ्या नविन फार्म हाउस वर जाणार आहोत अनिलने सर्व मित्रांना निमंत्रण दिले सर्व मित्र पाच वाजता अनिल च्या घरी जमले अनिल ने आपली गाडी काढली सर्वानी सामान भरले आणी मोठ्या उत्साहात सरव मित्र मोठ्या खुशिने निघाले गाडी भरधाव निघाली मित्रांचे बालपणिचे किस्से रंगले गप्पा गोष्टी चालु झाल्या अचानक अनिल ने मधेच सरवांना थांबवले
मित्रांनो आपण जिथे जात आहोत ते ठिकाण खुप जंगलात आहे शहरा पासुनदुर आणी ऐकांतात तसेच तिथे मोबाईल चि रेंज देखिल येत नाही नो ईंटरनेट गाईज अोनली गोसिप मोबाईल लॅपटोप बस तुम्ही तयार आहात ना
सरवानी होकार दिला अनिल ने थोड थांबत बोलला अजुन एक गोश्ट सरवानी प्रश्बारथक नजरेने अनिलनकडे पाहिले अनिल हसत हसत कारची स्टेअरिंग फिरवत होता असे बघु नका रे माजा कडे आपण खुप ईंजोय करु नो प्रोब्लेम सरव सोय केली आहे प्पानी
तिथे आपल जेवणा साठी सदा भाउ आहेत आणी एकलत का तिथे आपण एकटे नसु सरव मित्र एक मेकांकडे पाहु लागले अनिल पुढे म्हणाला कि हो ते फार्म हाउस भुतांनी भररा केला ति बघ आतल्या खोलीत उभी आपल्यालाच बघतेय हे दृश्य बघायला पण कोन थांबला नाहि ....सरवानी दरवाजा खोलुन जिव मुठित घेउन बाहेर धुम ठोकली ... धावता धावता अनिल अोरडु लागला थांबा एकत्र रहा नाहितर आपली संकट वाडतिल .. तस सरवांची पाउल धिमी झाली सरव एकत्र जमले
"
आता मी सांगतो ते लक्ष देउन एका सरवांवे जिव धोक्यात आहेत जरा हिमतिने काम घ्या .आपल्या सरवांना सुखरुप यातुन बाहेर काडायच आहे ..जयेश ने विकिने सदाभाउ ना कोंडुन ठेवलय ते अनिल ला सांगितल.... अनिल ने मान हलवली विकी वेड लागल होत का गरज काय होती हे सरव करायची ??? तुम्हि
एक काम करा
"
तुम्ही दोघ जण विकी आणी सदा भाऊ कुठे दिसतात का ते शोधा मि एकटातच जातो प्रतेकाने काळजि घ्या बोलत अनिल ने बॉटल मधल पाणी त्यांच्या अंगावर शिंपडल जयेश ने विचारल "तु मगाच पासुन हे पाणी वापरतोयस काय आहे हे???? कसल पाणी ???
अरे ज्या डोंगरावरच्या मंदिरात मि तुम्हाला सांगत होतो की माझ काहि राहिल आहे....!! तिच हि वस्तु कलशातिल पाणी देवाचा आशि्र्वाद म्हणुन बोटल मधे भरल जाणो देवाची काहि मरजी असेल ...
हो म्हणुनच तु परत गेलेलास आम्हाला सांगता ... "ठिक आहे आता वेळ दवडु नका तुम्ही जा.. देवाच नाव घ्या कामाला लागा ...कोणी एकट राहु नका ...आणि एक मेकांची सांथ सोडु नका... ते तिघ निघाले ...अनिल ला ति अडगळिची खोलि शोधायची होती पण ईथे कोन कुठुन येयिल याची काहि गॅरंटि नव्हती ..जयेश आणि सौरभ बॅटरीच्या प्रकाशात एकमेकांचा हात धरुन धिराने सर्वत्र विकिला आणि सदा भाउना शोधत होते... खुप आवाज येत होते ...त्यानी घराकडे वळुन पाहिले आत प्रकाश दिसत होता... पन लाईट तर गेली होती अचानक एक खिडखित एक मानुस दिसला... जयेश आजुनच घाबराला ....
हे बघ एकतर तु तरी घाबर मला नको घाबरउस चल ईथुन बोलता बोलता कोणितरी सोबत असल्याचा भास किंकाळ्या हसण्या रडण्याचा आवाज सरव गोंधळातच नाहि तर भितितही भर घालत होत.
ईतक्यात "अरे तो बघ विकी जमिनिवर बेशुद्ध पडलाय सौरभ ला विकी दिसला .. त्यानी घावतच त्याच्या जवळ जाउन त्याला खेचत बाजुला नेल... तस जयेश चे पाय कोणितरी खेचले आणि त्याला झाडित फेकल "कोण आहे जोर जोरात आरडा अोरडी करत भितिने गाळण झालेल्या जयेश समोर एक धिप्पाड माणसाची काळी सावली दिसली तसे जयेशला खेचुन सौरभ ने तिथुन बाजुला नेल दोघेही पळाले त्याना धावता धावता अनिल दिसला आनिल त्याना बघुन धावतच आला झालेला सरव प्रकार ऐकुन तो थक्क झाला !!!
एक काम करा सोबतच रहा यातुन मार्ग काडायला पाहिजे जयेश च्या हाता पायातुन रक्त येत होते झाडितल्या काट्यानी तो अक्षरक्षा सोलला होता..
अनिल लक्ष एका पडक्या खोली कडे गेल यात बघु सदा भाउ आहेत का ते ....त्याने धावत जाउन ते दार उघडले तस आतुन सदा भाउ हातात कुदळ घेउन वार करणारच होते तेवड्यात अनिल अोरडला त्याना ही कळल कि हा दुसरा तिसरा कोणी नसुन अनिल आहे त्या्ंच्या तोडातु शब्दच फुटत नव्हते आनिल ने थोड पाणि त्याना प्यायला दिल तस ते भानावर आले "बाळांनो त्या विकिने मला ईथे डांबल खर पण त्या दिव्याच्या वातिने मि दोरातुन सुटका केली पण हा दरवाजा त्या शक्तिंनी बंद केला माझी वाचाही गेली.. मला आता शेवटची आस होति तुम्ही आलात देवाचे खुप आभार आहेत ...तुम्ही मला शोधलात नाहितर माझ काय झाल असत विकि कुठेय ????
भाउ तोच तर नाहि आहे त्यानि घडलेला प्रसंग सांगितला
त्याच्या डोक्यावर परिणाम झाला आनी तो घराच्या बाहेर पडला आनी बाहेरच आहे बेशुद्धअवस्थेत....?
"
ठिक आहे चला त्याला आपण मिळुन बघु
बोलत ते विकि च्या दिशेने निघाले त्या जागी जाउन पोचले समोर बघतात तर काय विकी अंधारात ऊभा होता आनि त्यांच्या दिशेने हळुवार चालत होता मान खाली घालुन
सरवाना हायसे वाटले पण सदा भाउनी त्याना थांबवले घाई करु नका खात्री करा कारण हा आत्मा कोणाच्याही रुपात येतो जस माजा वेशात त्याला दिसला !!!
सदा भाऊ पुडे गेले अनिल ने त्याना ते पाणी दिले सदा भाउ विकि ला हाताने ईशारा करुन जागीच थांबायला सांगितले "तु जर विकी आहेस तर हि रेषा अोलांडुन ये त्यानी पाणि जमिनिवर अोतर एक अोळ मारली खुप वेळ झाला हा विकि हलत नव्हता कि ति रेषा पार करत नव्हता सरवांचा संक्षय खरा ठरला .. ईतक्यात तिथे मोठा स्पोठ झाला आणी तो विकि त्या धुरात गायब होउन तिथे आगिचा गोळा जमिनिवर पडला तस भाउ आनी सरव जण पुडे गेले त्यानी ती आग विझवली ते पुढे गेले काहि अंतरावरच विकि होता ....विकिच्या तोंडावर पाणि शिपंडले आनी त्याला जाग केल. विकि ने सरवाना बघिल त्याला हायस वाटल आनी सदा भाउ कडे बघुन तो रडु लागला माफि मागितलि
"
तुम्ही तरुण पोर चुका तर होणारच चला आता ईथुन निघु चला लवकर फार्म हाउस मधुन विचित्र आवाज येउ लागले
"
सदा भाउ काय करुया ????? 
"
शेवट" सदा भाउनी अनिल कडे बघत उत्तर दिले
चला माजा बरोबर त्यानी फार्म हाउस च्या मागे एका जमिनिच्या भागावर नेल आणी तिथे आजु बाजुची माती बाजुला केली देवाच नाव घेउन प्रार्थना करत त्या बोटल मधल पाणी त्या मातिवर टाकल.... पुरण बोटल खाली केली तिथे चिखल झाला आणी जमिनितुन विषिष्ट प्रकारचा घाण वास येउ लागला सरव जण बाजुला झाले जमिनितुन फेस निघु लागला आनी धुर येउ लागला सरवांना दर दरुन घाम फुटला... जिराचा वारा वाहु लागला किंकाळ्याचा लहान मुलांच्या रडण्याचा आणि स्त्रिच्या अोरडण्याचा हृदय पिळवटुन टाकणारा आवाज घुमला.!!!
सदा भाउ जोराने अोरडले तुझा दाह मि नाहिसा केलाय आता या जलाने शांत होशील जा आपल्या मुलाना घेउन इतक्यात अचानका त्यांच्या खुप जवऴ ति प्रकटली पांढरि फटक मोठे डोळे जऴलेली तिच्या सोबत ति दोन मुलेहि होती सर्व जण भितिने पुरते खाली झाले सदा भाउ एक मेकांचा हात पकडायला सांगितल कोणिही आपली जागा सोडु नका ति आपल्याला काहिच करणार नाहि ति बाई एका वायु स्वरुपात प्रकाशात रुपांतर झाली सोबत मुलेहि आनी त्या जमिनित सामावली तस सदा भाउ धावत
अरे भाउ कुठे जाताय सांग तरी भाउनी धावत जाउन ति माती हातात घेतली कुदळ आणली आणी घराच्या दुसर् भागी जाउन जमिन खोदु लागले .लाकड जमा करा सरवानी इथे तिथे पडलेली काट्या गोळा केल्या आणि त्या खड्डयात टाकल्या पालापाचोळा टाकुन अनिल ने त्याच्या कडची माचिस भाउना दिली त्यांनी तिथे आग लावली तस एका माणसाच्या विव्हळण्याचा आवाज आला त्या आगीत सदा भाउनी हातातली माती टाकली आणी जोरात अोरडले ...!
"
तुज्या पत्नी मुला ना जाऴलस स्वताहि जग सोडलस हि बघ माति झाली त्यांची झाला ना बदला तुजा.... जा आता ति आग अचानक भडकली त्या आगितल त्या माणसाच्या जळतानाच प्रत्यक्ष दृष्य सरवांनी पाहिल तिथे देखिल स्पोट होउन आग विझली
भाउ बाजुला झाले "जि आग त्यानी आपल्या संसाराला लावली त्यातच ते जळुन गेले.. आता एकमेकांच्या बदल्या साठि मेल्यानंतरही चैन नव्हती आता नाहि त्रास देणार ते
थोडा वेळ गेला पाहाटेची किरण विश्वास आणी आत्मिक सुख देणारी ठरली हळु हळु सुर्य नारायणाने दर्शन दिले तस सरव जण फार्म हाउस मधे आले सरवांनी खुप शांतिचा अनुभव घेतला . आता ते आपापले सामान जमा करु लागले सरवानी भाउंचे आभार मानले.
"
आता हे फार्महाउस तुमच ... तुम्हि ईथच रहा आम्ही कधी परत येउ तुम्हाला भेटायला विकिने भाउना मिठी मारली आणी बोलला आज कळली माणसा किंमत काय असते जिवन किति अमुल्य आहे ...देवाचे आभार
भाउ गेट जवळ सरवाना सोडायला आले सरव जण गाडित बसले फार्महाउस मागे सोडत ति गाडी निघाली. गाडितुन सर्व मागे वळुन फार्म हाउस कडे बघत भाउ कडे पाहिले भाउच्या डोळ्यात पाणि होत.... सरव हात दाखवत भाउंना निरोप देत निघाले जड मनाने भाउंचा निरोप घेतला गाडी परत मुंबई ला पोचली !!!!!!

फार्म हाउस भाग -


समाप्त.....


फार्म हाउस भाग -1 ; https://www.dailyallnews.ml/2018/11/blog-post_30.html