एक सत्य अनुभव (जरासा वेगळा)
- अभिषेक अरविंद दळवीएक अनुभव सांगतो ,याला काय म्हणायचं ते ठरवा तुम्ही.माझ्या घरी किचन च्या बेसिन जवळ एक बल्ब आहे , जो बरेच दिवस चिकचिक करत होता.
आजही मी पाणी प्यायला गेलो तेंव्हा तो बल्ब चिकचिक करतच होता. मी सहज गमतीच्या मूड मध्ये म्हणालो," तुझ्या अस्तित्वाला मी चॅलेंज देतो, हे माझं घर आहे, गेट आउट" हे सगळं मी हसत हसत म्हणालो. पण खरी मजा पुढे आहे. जेंव्हा हे वाक्य मी बोललो तेंव्हा बल्ब चिकचिक करायचा थांबला. माझ्या काळजात धस्स झालं. मी म्हटलं बोलाफुलाला गाठ पडली असेल, आणि स्वतःची समजूत घालून वळणार इतक्यात तो बल्ब पुन्हा चिकचिक करू लागला.
मी चेव आल्यासारखी गर्जना केली. (ही गर्जना अर्थात मनात होती, नाहीतर साडे अकरा वाजता बल्ब समोर आरडाओरड केली म्हणून घरच्यांनी मला वेड्यात काढलं असतं.) "तू जे कुणी किंवा जे काही असशील ते इथून निघून जा. हे घर माझं आहे. गेट आउट. " बल्ब पुन्हा स्तब्ध! काहीतरी गडबड आहे खरी हे मनात यायला आणि बल्ब पुन्हा चिकचिक व्हायला एकच क्षण जुळला. मी तडक काल भैरवाष्टकम सुरू केलं. पहिला श्लोक पूर्ण झाला आणि बल्ब नॉर्मल झाला. मी पाणी हातात घेतलं. तोंडाने श्लोक चालूच होते. अष्टक फ्रँ झाल्यावर ते पाणी त्या जागेवर शिंपडलं. बल्ब आता नॉर्मल झाला होता. नंतर मी दोनदा चालू बंद करून पण पाहिला , एकदम ओके!मी आईला याबद्दल जास्त खोलात न जाता बल्ब च्या चिकचिक होण्याबद्दल जुजबी चौकशी कर्ली. तिच्या म्हणण्याप्रमाणे तो बल्ब जुना होता , आणि असा बंद होण्यापूर्वी बल्ब तसे रिऍक्ट होतात. मला सगळं पटलं, पण एक शंका मनात राहिली. बोलफुलाला गाठ एकदा पडेल, दोनदा पडेल पण सारखी कशी पडेल ? आणि जर बल्ब बिघडलाच होता तर स्तोत्र पूर्ण झाल्यावर तो नॉर्मल कसा झाला ? असो , सृष्टीची कोडी अजब असतात . तुमच्या घरात असा चिकचिक करणारा बल्ब नाहीये ना????
अभिषेक अरविंद दळवी
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें
Thank you for comment.