फ़ार्म हाउस 😱 ( भाग -१ )
"सौरभ, विक्रांत जयेश आणि अनिल हे चार लंगोटी यार खुप वर्षांनी एकत्र भेटणार होते .. लहान पणा पासुन एकत्र वाढलेले दंगा मस्ती मधे जिवन जगलेले आंनदाने नाहुन गेलेले हे यार आता आपापल्या आयुष्यातील वेळ काढुन खास भेटणार होते. दिवस ठरला वेळ ठरली जागा निवडली ... अनिलच फार्म हाउस ...!!
शहरा पासुन दुर एकांतात वसलेल, अनिलच्या वडलानी खुप वर्षा अगोदर विकत घेतलेल पण तिथे कोणिच जात नसायच, वर्षानु वर्ष बंद पडलेल हे फार्म हाउस नुकतच अनिलच्या वडलानी साफ सफाई करुन चालु करुन घेतल होत ...!तिथे काम करणार्या मजुरांच म्हणन होत की ते फार्म हाऊस झपाटलेल आहे ... त्यांना हि काम करत असताना खुप भयानक आणी अविश्वसनिय अनुभव आले होते. दिवसा तर ठिक पण रात्री या फार्म हाउस मधुन चित्र विचित्र आवाज ऐकु येत असत. असा रहिवाशांचा अनुभव होता ..
हे फार्म हाउस वापरात काढायच्या उद्देशाने अनिलच्या वडलानी ते अनिल ला दिल .. अनिलचे वडिल बिजनेस मॅन असल्याने या सर्व वावड्या असल्याच त्यांच म्हनणे होते. हि जागा बळकवण्या साठि ठेकेदारांचा डाव असावा असा त्यांचा विश्वास होता. असो ...
सुट्टी च सेलिब्रेशन फार्म हाउस वर मोठ्या जल्लोशात साजर करायच अस ठरल होत. सुट्टी इंन्जोय करायला मित्र सज्ज झाले आणि तो दिवस उजाडला .
"सरवानी माझ्या घरी ठिक ५ वाजता जमायच आहे आपण माझ्या नविन फार्म हाउस वर जाणार आहोत...! अनिलने सर्व मित्रांना निमंत्रण दिले त्या दिवशी सर्व मित् जवळ पास पाच च्या आसपास अनिल च्या घरी जमले अनिल ने आपली गाडी काढली सर्वानी सामान भरले आणी मोठ्या उत्साहात सरव मित्र मोठ्या खुशिने निघाले गाडी भरधाव निघाली. मित्रांचे बालपणिचे किस्से रंगले गप्पा गोष्टी चालु झाल्या अचानक अनिल ने मधेच सरवांना थांबवले .
मित्रांनो आपण जिथे जात आहोत ते ठिकाण खुप जंगलात आहे शहरा पासुन दुर आणी ऐकांतात तसेच तिथे मोबाईल चि रेंज देखिल येत नाही. नो ईंटरनेट गाईज अोनली गोसिप मोबाईल लॅपटोप बस.... तुम्ही तयार आहात ना ....
सरवानी होकार दिला अनिल थोड थांबत बोलला अजुन एक गोष्ट ...सरवानी प्रश्नारर्थक नजरेने अनिलनकडे पाहिले अनिल हसत हसत कारची स्टेअरिंग फिरवत होता असे बघु नका रे माजा कडे आपण खुप ईंजोय करु नो प्रोब्लेम सरव सोय केली आहे पप्पानी ..
तिथे आपल्या जेवणासाठी सदा भाउ आहेत . आणी एकलत का तिथे आपण एकटे नसु ...सरव मित्र एक मेकांकडे पाहु लागले ..अनिल पुढे म्हणाला कि " हो ते फार्म हाउस भुतांनी भरलेल आहे अस तिथल्या लोकांच म्हणन आहे ... "
"अरे वाह मग तर आपल फुकटात मनोरंजन होईल विक्रांत हसत बोलला ... सौरभ ने सरवांना सांगितल कि आपन ईतकी भुत असताना त्या भुतांच काय घेउन बसलात जे होईल ते बघु .. काय बोलतोस जयेश ने देखिल होकार भरला ..
अनिल चि कार मजल दरमजल करत शहरापासुन दुरच्या या फार्म हाउस वर पोचली. संध्याकाळ चे ५ वाजले होते. गाडी फार्म हाउस च्या गेट जवळ पोचली. गेट बंद होता सौरभ गाडितुन उतरला . त्याने गेट उघडला आणि परत कार मधे जाउन बसला गाडी आत पार्क केली अरे गेट बंद केलाच नाहि सौरभ ने मित्रानां सांगितले गेट बंद होता. अनिल आणी मित्रांना आश्चर्य वाटल कोणि बंद केला कि हवेने झाला जाउदेत मी सदा भाउना फोन लावतो ते येतिल चावी घेउन....!
तेवढ्यात घराच्या मागच्या बाजुने सदाभाउ समोर आले अनिल दचकला . सरवे आश्चर्यचकित झाले.
"आलात छोटे मालक मिच गेट बंद केला मालकानी मला कालच फोन करुन सांगितले होते... कधी रेंज असते नसते तुम्हाला त्रास नको म्हणुन लवकरच आलो तुम्ही आज येणार याची सरव तयारी केली आहे तुमच्या खाण्या पिण्याची निवांत रहा आता चार दिवस ... तुम्हाला काहि कमि पडणार नाही मि आहे ना ....
६० वर्षाचे सदाभाउ भरदार आवाजात बोलले भाउंनि सरवांवर नजर फिरवली आणी बोलले "पहिल्यांदाच कोणी ईतक्या वरषात ईथे पाउल ठेवलय बर वाटल....
"म्हणजे ....?? सौरभ ने विचारले तस सदा भाउनि तोंड फिरवुन " ते सावकाश बोलु आधी आपापल्या खोलीत चला... सामान ठेउ सदाभाउनी विषय टाळला ...आणी दरवाजाच्या कुलुपाला चावि लावली !!!
कुलुपाची खडखड वाजु लागली . ताेच आकाशात पक्षांचा गोंधळ चालु झाला. पक्षांच्या कर्कश आवाजाने वातावरण घुमले सरव जन वर पाहु लागले . आकाशात खुप पक्षी अचानक फिरु लागले. जणु कोणी तरी आपल्या अस्तित्वाची जाणिव त्यांना करुन दिली.
सरवांनी आत प्रवेश केला, सदा भाउंनी स्विच अॉन केला सरव घर छान होते ..सदाभाउन कडे बघत अनिल ने त्याना धन्यवाद दिला ...तुम्ही छान सांभाळलत हे फार्म हाउस ... सदाभाऊ पुर्ण घरावर संक्षयी नजरेने पहात बोलले "आता पासुन हि जवाबदारी तुमची ...आलात ना तुम्ही छोटे मालक. हे बोलत त्या्नि घराच्या किल्ल्या अनिल कडे दिल्या. तुम्ही हात पाय धऊन घ्या मि नाश्ता आनी जेवण बाकिची तयारी करतो. चारी मित्राना पुर्ण घर आवडले मोठे प्रशस्त हवेशीर सरव ठिक चालले होते. सौरभ ने सदा भाउना विचारले तुम्ही किति वर्षा पासुन हे फार्म हाउस संभाळता ???
"बाळा खाउन घे सरव सविस्तर बोलु , थकला असला ना सर्व बोलत त्यांनी विषय टाळला सदा भाउ किचन मधे गेले. आणि त्यानी गरमा गरम नाश्ता तयार केला
सरवांसाठी तसे सरव जण तुटुन पडले ...आणी भाउंची खुप तारिफ हि केली . सरवांच्या गप्पा चालु झाल्या... सदा भाउ ईथे सरव खिडकी दरवाजे बंद करत होते . जयेश आणि अनिल तिथे अाले विक्रांतही आला ...फार छान होता नाश्ता ...
सदा भाउनी त्यांच्याकडे पाहिले .
"पोरांनो तुम्ही माजा मुला सारखे आहात म्हणुन मि काय सांगतो ते लक्ष देउन एका.... ईथे तुम्हि चार दिवस रहाणार मग जाल मग परत हे फार्म हाउस अोसाड पडेल या साठी तुम्हाला काहि सांगायचय
"काय ??????????
सर्वाना प्रश्न पडला !!!!!!
" सांगतो हॉल मधे चला.... बोलत ते चौघ हॉल मधे आले. तुम्ही आजच्या जमान्यातली माणस तुम्ही भुता खेतांवर विश्वास ठेवत नसाल माहित आहे मला.. पण पोरांनो तुम्हाला घाबरवत नाहि.... पण सांगतो मालकांनी हे फार्म हाउस घेण्याअगोदर शुद्धीकरण करायला हव होत... म्हणजे हे घर आधिच खुप चर्चेत आहे ...मला हि ईथे काम करताना खुप अनुभव आले ... पन मि माझ्या बाजुने सावध असतो यामुळे मला कोणतिहि बाधा झाली नाहि. "तुम्हाला ईथे काहि भिति वाटली किंवा कसलिही गरज असली तर मला सांगा....तस फारस ईथे कोणि राहिलेल नाहि ... पन तुम्ही ईथे राहुन ईथला एकांत दुर कराल आणि आपल्या माणसांच्या राहण्यायोग्य हि वास्तु व्हावी हिच माझी अपेक्षा आहे ...
"काका मला समजल नाही सौरभ ने विचारणा केली
"बेटा तुम्ही ईथे विसावा घ्यायला आला म्हनुन तुला सांगतो तुम्ही ईथे स्वता बघा अनुभव घ्या.... आणि काहितरी करा या जागेसाठी.... घाबरु नका तुमची जवाबदारी माझी आहे... तुम्ही आपल्या जिवाची मजा करा पन काळजि घ्या ...हिच अपेक्षा आहे ... zहे मि खरतर तुम्हाला सांगायला नको होत... पन तुम्हाला काहि ईजा होउ नये या साठी हे सांगाव लागल...रात्री कोणि हाक दिली आवाज दिला तरी काही झाल तरी दरवाजा खोलायचा नाहि ... जास्त काहि सांगत नाही उगाच घाबराल ..उद्या बोलु ... ईतक्यात विक्रांत तिथे सर्व फार्म हाउस हुडकुन आला ... "सांगा याला पण म्हणत सदाभाउ निघाले ...मि जेवण करतो मात्र नंतर मी थांबणार नाहि सकाळीच आपली भेट होईल.... मि ईथुन काहि अंतरावरच रहातो माझ घर जवळच आहे . जर तसच काहि असेल तर मला बोलवा मि येयिन.... सरव जण एकमेकांकडे पाहु लागले त्याना काहिच कळेना काय रिऐक्ट व्हाव !!!!
जेवण झाली...गप्पा रंगल्या ...सरव पोट भरुन जेवले म्युझिक सरव चालु झाल... नेट नसल्याने सरवाना गप्पा हा एकच मार्ग होता. खुप आठवणींना उजाळा मिळाला सरव जण खुश होते .यात सरव विसरुन गेले भाउनी काय सांगितल ते... १० वाजले आता भाउ परतिला निघाले "चला मुलांनो उद्या भेटु मि निघतो... काळजि घ्या एकत्र रहा ..कोणिही एकट राहु नका... काहि गरज असेल तर मला फोन करा... हा माझा पत्ता थोड्या अंतरावरच मि आहे मला भेटा... शुभरात्री बोलत भाउ नी फार्म हाउस सोडलं तस अनिल ने गेट बंद केला आणी आत येउन दरवाजा हि लावला ... लगेचच दरवाजा ठोकल्याचा आवाज झाला अनिल ने पटकन उघडला आजुबाजुला कोन नाहि याची खात्री करुन पटकन लाउन घेतला आणि घाबरुन आत गेला ...
सौरभ आपल्या आवडत्या गाण्यांवर थिरकत होता. इथे विक्रांत आणि जयेश देखिल मजा घेत होते. आणी इतक्यात तिथे अनिल ने घाबरलेल्या चेहर्याने प्रवेश केला तस विक्रांत त्याला धिर देत मजेत बोलला...
अनिल यार तु पन त्यांच्या बोलण्यात आलासका ???? मला तर किव येते या लोकांची भुत म्हणे ....हाहाहााहा चल ये enjoy करु ...अनिल देखिल join झाला खुप धमाल मस्ति झाली सरव जण मुड मधे होते कोणालच कशाचे भान नव्हते ना कशाचीहि फिकिर ...
रात्रिचे ११वाजले ....चारी मित्र आज झोपु उद्या मग बघु काय प्लान करायचा तो ठरवु बोलत झोपायला निघाले. तसे फार्म हाउस मोठ होत चार पाच खोल्या होत्या पन सरवानी दोघ दोघ झोपायच अस ठरल . आणि सरव जण आपापल्या रुम मधे जाउन झोपी गेले .
रात्री चे दोन वाजले सरव शांत झोपले होते अनिल सौरभ बरोबर आणि जयेश विक्रांत बरोबर ... ईथे विक्रांतला रात्री दरवाजा ठोकल्याचा आवाज आला विक्रांत दचकुन ऊठला आणी जयेश झोपलेला पाहुन तो स्वता रुमच्या दरवाजा जवळ गेला... अनिल किंवा सौरभ असावा असा त्याचा अंदाज होता. विक्रांत भुता खेताना मानत नव्हता तो बिंदास ऊठला आणि दरवाजा उघडला पन कोणिच नव्हत त्याने खात्री केली आणी परत जायला निघणार येवड्यात त्याच लक्ष हॉलच्या मेन दरवाजावर गेल तो कोणि तरी ठोकवत होता... "कोन असेल ईतक्या रात्री म्हणुन मोबाईल चा टोर्च अोन करत विक्रांत दरवाजा जवळ गेला ...दरवाजा खरच कोणि ठोकत होत...
"कोण आहे बाहेर ???? बोला कोन आहे ????
तरि प्रतिसाद आला नाहि विक्रांत ने भाउंचे काहिच बोलणे एकल नव्हत तो तिथे नव्हता त्या मुळे याच गांभिर्य त्याला नव्हत.. मोठ्या धिराने त्याने दरवाजा उघडाला बाहेर असलेल्या माणसाने तो अतिशय ताकतिने तो उघडला विक्रांत घाबरला .... कssss क sssक कोण कोण... भितिने तोंडातुन शब्द निघत नव्हते ईतक्यात फटकन तिथे सदाभाउ प्रकट झाले पाढर फटक तोंड त्यांच्या चेहर्यावर टोर्च मारताच ते एकदम विचित्र प्रकारे मोठ मोठ्याने हसायाला लागले... विक्रांत आता पुरता घाबरला त्याने पाहिल तर विचित्र दिसल त्याना पाय नव्हते ते अधांतरी आहेत हे लक्षात येताच विक्रांत ने दरवाजा तसाच बंद केला आणी त्याची भितिने गाळण होउन अक्षरक्ष बेशुद्ध ह पडला ..दैव बलवत्तर म्हनुन दरवाजा बंद झाला आणि विक्रांतचे प्राण वाचले.. सकाळी आलाराम वाजला जयेश ला विक्रांत दिसला नाहि म्हणुन तो बाजुच्या रुम मधे जाउन अनिल ला विचारु लागला तसे सरव त्याला हाका मारु लागले ..आणि मग त्याना तो दिसला मेन डोउर जवळ बेशुद्धा अवस्थेत त्यानि विक्रांत च्या तोंडावर पाणि मारले विक्रांत घाबरुन ऊठला भाउ भाउ करु लागला जयेश ने विचारल कि काय झाल... तस त्यानी तो किस्सा सांगितला तो खुप घाबरला होता... सरव जण आत आले तसे त्यानी सदाभाउना फोन लावला पन लागत नव्हता येतिलच ते सकाळी येतो म्हणुन बोलले होते ... तु नक्की बोल काल कोन होत भाउच होते का ????
माहित नाहि मला नाहि माहित ते भाउ होते कि कोण पन ते हवेत अधांतरी होते पाय नव्हते त्याना आणि जोेेर जोरात हसत होते मला ते सदा भाउ वाटात नव्हते दुसरच कोन असाव??? अनिल प्रचंड घाबरला पाणी पानी विक्रांतचा गळा सुकला... हा भयानक प्रकार आयुष्यात पहिल्यांंदाच अनुभवल्याने तो खुपच भयभित झाल होता हे अस पन असु शकत हे विश्वास बसण्या पलिकडच होत भले ते भाउच होते पन त्यांचे पाय का नव्हते ???? मग ते असे उभेच कशे राहु शकतात ??? अनिल ने विक्रांतला धिर दिला तुला भास झाला का झोपेत असल्यामुळे अस होउ शकत .!!!!!
"माहित नाहि माजा असल्या गोष्टिंवर विश्वास नाहि पन मि जे पाहिल तो भास होता का कि सत्य !??? मला काहिच कळत नाहि बेशुद्ध पडल्याने मला फारस आठवत नाहि मला फ्रेश होउदे ...चला आत सरव बोलत जयेश ने अनिल कडे धाव घेतली.
"अनिल.. ते भाउ आपल्याला बोललेले काळजि घ्या म्हणुन हा तोच प्रकार तर नाहि ना ???? काय वाटत तुला ????
"मला हि असच वाटतय नाहितरी विक्रांतचा भुताखेतांवर विश्वास नाही त्याने हे पाहिल मग नक्किच काहितरि असाव....! भाउ यायची वाट बघु त्यांनाच विचारु ...
थोड्याच वेळात भाउ आले सरवांनी भाउना घेरल आणी सरव हकीकत सांगुन मन मोकळ केल तेव्हा त्याना धिर आला.
"मि तुम्हाला आधिच सांगितल होत रात्रीच दरवाजे खिडक्या उघडु नका हा मुलगा तेव्हा नव्हता याला तुम्ही काय सांगितल नव्हत का ...??? हो भाउ पन त्याला याची कल्पना नव्हति हे अनपेक्षीत आहे आमव्या सरवांसाठी भले हे विक्रांत ने अनुभवलय पन आम्हाला हि याची काळजी आहे.
या पोरांनो बसा तुम्हाला सांगतो या फार्म हाउस वर फार वर्षा पुरवी एक बंगला होता त्यात एक दांपत्त रहायच ते सुखी कुटुंब होते पन एक दिवस नवरा बाहेर गावी कामावर गेला होता . तो अचानक परतल्यावर त्याची पत्नी त्याला पर पुरुषा सोबत नकोत्या अवस्थेत आढळली त्या माणसा सोबत याची हातापायी झाली तो माणुस तर तिथुन पळाला पण याचा सरव राग त्याने आपल्या बायको मुलांवर काडला स्वता आत्महत्या करण्या पुर्वी त्याने घर पेटवल त्यातच त्याची बायको मुल गेली त्याने हे दृष्य पाहुन स्वताला पन गोळी मारुन जिवन संपवले त्या दिवसा पासुन ईथे सरव शांत झाले खुप वरषा नंतर रात्री बे रात्री ईथे भयंकर किंकाळ्या येकु येउ लागल्या .. हि जागा राहाण्या योग्य राहिली नाही
"काल रात्री आम्हाला असा अनुभव नाहि आला ?????? सौरभ ने शंका उपस्थित केली
"तुम्ही गाढ झोपलात म्हणुन तुम्हाला काहि समजल नाही चला गरमा गरम नाश्ता करुन घ्या मि जेवणाची तयारी करतो....
"तुम्हाला भिती नाहि वाटत अनिल ने भाउंना विचारल
"हो वाटते ना.... जरुर वाटते... पन अस देखिल वाटत की हे सरव ईथुन जाव... कारण मला ईथे रोजी रोटीचा सवाल आहे नाविलाज।...इथे मालक जेवडा पगार देतात तेवडा कुठे मिळणार पन नाही !!!
माझ्या गळ्यात ताईत नेहमी असतो जो मला या पिशाच्यांपासुन संरक्षण देतो.... पन माझा कडे तो एकच आहे !!!
" बाळांनो तुमची जवाबदारी माजावर आहे... जाताना सरव दार खिडक्या निट लावा रात्री अपरात्री दरवाजा उघडु नका... अगदि मि दिसलो तरी त्यानी विक्रांत कडे पाहात म्हंटले "आता तुम्ही आलात पोरांनो मला धिर आलाय आता या संकटाचा पन आपन सामना करु. "पण याची गरजच काय आपला जिव धोक्यात घालुन ईथे का थांबायच आम्ही जयेश बोलला !!!!
"खरय तुमच तुम्ही जाल... परत हे विरान होईल परत कोणि येयिल ईथे ते त्रास कायम असतिल... तर तुम्हाला वाटात नाहि का कि ईथे शांति नांदावी ??
"अनिल ने जयेश कडे पाहिल
ठिक आहे काका आम्ही आहोत तुमच्या सोबत तुम्ही नाशत्याचि सोय करा आम्ही आज ट्रेक ला जाणार आहोत सरव जण तयारीला लागले ...नाश्ता झाला तयारी सुरु झाली सरव सामान जमवल्यावर अनिल ने गाडी काडली आनी जवळच्या डोंगर माळराणात फरफटका मारण्यासाठी सरवानी कुच केली....
डोंगर माथ्याच्या पायथ्याशी गाडी लावली. सरव जण बाहेर पडले...डोंगर चडु लागले गप्पा गोष्टी चालु झाल्या सरव जण खुश होते भंकस मजा मस्ती करत ते डोंगरा वर चडले दुर दुर वर कोणिच नव्हत ट्रेकींग ची मजा घेतली नंतर एका झाडा खाली विश्रांती घेतली आणि निसर्गाचा आस्वाद घेत होते हावा सुटली होती तेवड्यात त्यांची नजर एका पडक्या मंदिरा जवळ गेली....
क्रमश :